*शब्दगंध च्या वतीने पाथर्डी येथे जिल्हास्तरीय काव्य संमेलन*
पाथर्डी/अहिल्यानगर: *ग्रामीण भागातील नवोदितांना साहित्यिक विचारपीठ मिळण्यासाठी शब्दगंध च्या वतीने 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे* अशी माहिती शब्दगंध चे कार्यवाह भारत गाडेकर व राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच कोहिनूर मंगल कार्यालय, अहिल्यानगर येथे राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.यावेळी शब्दगंध चे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, ज्ञानदेव पांडुळे, माजी प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, भगवान राऊत, बबनराव गिरी, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, डॉ.अनिल गर्जे,स्वाती ठुबे, शर्मिला गोसावी, प्रशांत सूर्यवंशी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मागील सभेचे इतिवृत्त व आळंदी येथे पार पडलेल्या मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रमाचा जमा खर्च वाचून दाखवण्यात आला, नवीन सभासदांना मंजुरी देण्यात आली.शब्दगंध च्या राहुरी, पाथर्डी व नगर तालुका शाखांचे पुनर्जीवन करायचे निश्चित करण्यात आले. पाथर्डी येथे शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची बैठक व जिल्हास्तरीय काव्य संमेलन दिनांक १४ सप्टेंबर रोजी घ्यायचे ठरले.राजेंद्र उदागे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, भारत गाडेकर यांना सुवर्णयुग मंडळाचा साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व छत्रपती संभाजीनगर येथील मार्गदर्शक प्रा.डॉ. गणी पटेल यांची राज्य सहकार संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
या जिल्हास्तरीय काव्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी डॉ.अशोक कानडे (८८३०४०५९५१) किंवा शर्मिला गोसावी (९९२१००९७५०) यांच्याकडे नाव नोंदणी करावी शब्दगंधच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस राजेंद्र चोभे, बाळासाहेब देशमुख, मारुती खडके, मारुती सावंत, सुजाता पुरी,शर्मिला रणधीर, श्यामा मंडलिक, स्वाती अहिरे, हर्षली गिरी, मकरंद घोडके यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.
*सुनील गोसावी*
संस्थापक,सचिव
stay connected