*पाटोद्यात क्रांतीसिंह नाना पाटील गणेश मित्र मंडळातर्फे भव्य नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न*
पाटोदा *(प्रतिनिधी)*
पाटोदा शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील गणेश मित्र मंडळा तर्फे आयोजित भव्य नृत्य स्पर्धा अतिशय जल्लोषात व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. यावर्षी गणेशोत्सवात सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेसाठी पाटोदा शहरासह परिसरातील अनेक नृत्यकलावंतांनी सहभाग नोंदविला. लहान मुलांपासून ते तरुणाईपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी रंगतदार नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट मिळाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विजय शिंदे यांनी भूषवले. उपाध्यक्षपदाची धुरा सुमित कुटे व रोहन वीर यांनी सांभाळली. मंडळाचे सचिव निखिल सरगर यांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.तसेच सदस्य म्हणून सतीश घोलप, तोशिप खान, दिपक वीर, योगेश इंगोले, अक्षय वीर, जयसिंग सोंडगे, शिवम चौरे, ऋषिकेश वीर, अभी जाधव, यश जावळे, अनिकेत जावळे, अमन शेख, अजित बेद्रे, मुकेश ननवरे, विशाल महामुनी, आप्पा राऊत, रोहित वैद्य, अजय वाल्हेकर आदींनी संघटितपणे परिश्रम घेतले. सर्व सदस्यांच्या एकजुटीमुळेच हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविता आला.
कार्यक्रम स्थळी प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. सादरकर्त्यांनी सादर केलेल्या हिंदी, मराठी, पारंपरिक व फ्युजन नृत्य प्रकारांना भरभरून दाद मिळाली. प्रत्येक सहभागीला प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. तर विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून पाटोदा शहरातील तरुणाईला आपली कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक न राहता सांस्कृतिक व सामाजिक ऐक्याचे प्रतीक व्हावे या हेतूने केलेला मंडळाचा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरला.
stay connected