शांतता टिकविण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या धर्माचे पालन करावे - डॉ.सुधीर तांबे

 *शांतता टिकविण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या धर्माचे पालन करावे - डॉ.सुधीर तांबे*



*मानवता संदेश फाउंडेशन तर्फे पैगंबर जयंतीनिमित्त ग्रंथ वितरण संपन्न*


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - 

देशातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या धर्माप्रमाणे आचरण केल्यास सर्वत्र शांतता निर्माण होईल.धर्म हा मानवतेची शिकवण देत असतो. राजकीय किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी सामाजिक धार्मिक विष पेरणारी लोक समाजात वाढत आहेत. सामान्य माणसाच्या मनात कुठलीही द्वेष भावना नसते. ते माणुसकीच्या नात्याने एकोप्याने जगतात. प्रत्येकाने किमान आपल्या धर्माचे पालन केले तरी सामाजिक सलोखा टिकेल, कारण कुठलाही धर्म दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवत नाही. भूतदया आणि करुणा हीच प्रत्येक धर्माची शिकवण आहे.धर्म संस्थापक हे धर्म सुधारक आहेत, त्यांच्या शिकवणुकीचे आपण तंतोतंत पालन करायला हवे,असे आवाहन माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.



येथील शासकीय विश्रामगृहात मानवता संदेश फाउंडेशन व जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित महंमद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणाऱ्या ग्रंथाचे वितरण शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी

  डॉ. तांबे बोलत होते. 

नॅब संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ भागचंद चुडीवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या समन्वयक मंजुश्री मुरकुटे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी,सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे,विधी व न्याय खात्याचे माजी उपसचिव बाळासाहेब देशमुख,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,राज्य क्रीडा परिषदेचे माजी सदस्य लकी सेठी,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड ,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर व महेश रक्ताटे,संपादक करण नवले,माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख,मुख्तारभाई शहा, रईस जहागीरदार,अँकर असोसिएशनचे अध्यक्ष आदिनाथ जोशी,अशोक उपाध्ये,डॉ.निशिकांत चव्हाण,ज्येष्ठ पत्रकार मारूतराव राशिनकर आदि व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते.


माजी आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले कि हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांचे संपूर्ण जीवन आदर्श आहे. साने गुरुजींनी पैगंबरांच्या करुणा व दया या बद्दल खूप चांगलं लिहिलं आहे.कुठलाही धर्म दुसऱ्याचा द्वेष शिकवत नाही. पण आज स्वार्थापोटी द्वेष पसरवणारे अतिशय वेगात कामाला लागले आहे.त्यामुळे आता समाजात वेगवेगळ्या

क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी समाजाला जागरूक करण्यासाठी आणि भारताच्या संविधानानुसार जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.आपण प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी पार पाडून पसरवली जाणारी जातीय किंवा धार्मिक कटूता कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.



आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले की प्रत्येकाचे राजकीय विचार वेगळे असले तरी श्रीरामपूरच्या शांततेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे कारण शांतते शिवाय कुठलाही विकास शक्य नसतो. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे मानवता संदेश फाउंडेशन चे कार्य उल्लेखनीय आहे असे ही ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ चुडीवाल, अनुराधा आदिक,मंजुश्री मुरकुटे,करण ससाणे,परिवहन अधिकारी अनंता जोशी,शहर काजी सय्यद अकबरअली यांची भाषणे झाली. 

प्रारंभी आयोजकांच्या वतीने मानवता संदेश फाउंडेशनचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.विधीज्ञ समीन बागवान यांनी सूत्रसंचालन केले.आभार अशोक उपाध्ये यांनी मानले.


कार्यक्रमाला माजी प्राचार्य टी ई शेळके,डॉ.प्रा.बाबुराव उपाध्ये,प्रा.शिवाजी बारगळ,सुकदेव सुकळे,ॲड. शफी शेख,ॲड.कलीम शेख,प्रा.सतीश म्हसे,प्रा. लक्ष्मण कोल्हे,प्रा.ज्ञानेश गवले,राजेंद्र हिवाळे,प्रवीण जमदाडे,लबाजी कोल्हे गुरुजी,के टी निंभोरे,जीवन सुरुडे,ज्येष्ठ पत्रकार मारुती राशिनकर,बद्रीनारायण वढणे,प्रदीप आहेर,अनिल पांडे,महेश माळवे,महेश माळवे, सचिन उघडे,नितीन चित्ते,लालमोहम्मद जागीरदार,मिलिंदकुमार साळवे,देविदास देसाई,चंद्रकांत झुरंगे,महेबूब कुरेशी,सलीम जहागीरदार,सुनील साळवे,अवधूत कुलकर्णी,गणेश पिंगळे,सलीमभाई बारूद वाले,मुस्ताक सर, किशोर त्रिभुवन,प्रदीप दळवी,राजू गायकवाड,अजय धाकतोडे,सचिन शिंदे,सय्यद इमाम,सय्यद जाकीर हुसेन,आयाज तांबोळी,रज्जाक पठाण,

साजिद शेख,रफिक मेजर,विलास कुलकर्णी,

यांच्यासह विविध पक्षातील सर्वधर्मीय पदाधिकारी,

कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नजीरभाई शेख,खालिद मोमीन,तन्वीर शेख,डॉ.सलीम शेख,

डॉ.अफराज तांबोळी,फिरोज पठाण,मोहम्मद बदर शेख, फय्याज पठाण,बबलू काझी, हारुण अब्दुल्लाह,मुदस्सर शेख,अरबाज पठाण,

शाहबाज सय्यद,जुनेद जागीरदार,शोएब पठाण,रेहान पठाण आदींनी प्रयत्न केले.


मानवता संदेश फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमाला शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पुढारी आपले राजकीय मतभेद विसरून उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या काळात सुद्धा सर्वजण आपले पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले याबद्दल उपस्थितांनी कौतुक केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.