दहा दिवस विविध उपक्रम राबवत असलेल्या संघर्ष योद्धा गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला एपीआय मंगेश साळवे यांची भेट

 *दहा दिवस विविध उपक्रम राबवत असलेल्या संघर्ष योद्धा गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला एपीआय मंगेश साळवे यांची भेट*



  कासम शेख दौलवडगाव...

आष्टी तालुक्यातील दौलवडगाव येथे संघर्ष योद्धा गणेश मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक व सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांनीही गाजला. मंडळाने सलग दहा दिवस रोज नव नवीन उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सवाला सामाजिक भान जोडून. संघर्ष योद्धा मित्र मंडळ स्थापन होऊन अगदी दुसऱ्या वर्षीच मंडळांने नावलौकिक मिळवले.

 या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने 

आज दहा दिवसांच्या भक्तिभाव, उपक्रमशीलता व उत्साहानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक अभंग आणि ओव्या म्हणत टाळ मृदुंगाच्या स्वरात, लेझीम फुगडी खेळत. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषाने वातावरण भारून गेले. विशेष म्हणजे संघर्ष योद्धा गणेश मंडळाला अंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री मंगेश साळवे साहेब यांनी भेट देऊन “गणपती बाप्पा हा केवळ आनंदाचा नव्हे तर सामाजिक बांधिलकीचा प्रतीक आहे. म्हणूनच आम्ही पण उपक्रमशीलतेला प्राधान्य देतो असे म्हणत मंडळाचे कौतुक केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोटीराम कोहक यांनी पुढील काळातही हे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प असून यापेक्षाही जास्त धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार आहोत असे ग्रामस्थांना आश्वासित केले. यावेळी संघर्ष योद्धा गणेश मंडळाचे नवनाथ कोहक, नितीन कोहक, परमेश्वर पवार, किसन कोहक, सर्व सभासद सदस्य उपस्थित होते.शेकडो ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.