*मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांनी दिली छत्रपती संभाजीनगर ला भेट..*
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाजवळ असलेल्या संत एकनाथ नाट्य मंदिर याठिकाणी होत आहे.या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पूर्व तयारी साठी आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त *मा.श्री.एस.एम.देशमुख सर* विश्वस्त मा.शरद पाबळे,सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे,डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे,परिषदेचे राज्य उपाध्यक्ष मा.गणेश मोकाशी, छत्रपती संभाजीनगर मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष - बालाजी सूर्यवंशी, कार्याध्यक्ष - कानिफ अन्नपूर्णे, सचिव- प्रकाश भगनुरे, उपाध्यक्ष- महादेव जामणीक,डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेश सदस्य जितेंद्र सिरसाठ,डिजिटल मिडिया परिषदेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विश्वंभर मुळे व इतर पत्रकार बांधवांनी नियोजीत संत एकनाथ रंग मंदिर, क्रांती चौक येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांना या राज्यव्यापी अधिवेशना बाबत मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांनी मार्गदर्शनही केले.
stay connected