विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी
तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेतर्फे आदर्श पुरस्कार
आष्टी
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या वतीने आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक स्वास्थ्य सुदृढ राहावे व आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत . आष्टी तालुक्यातील सर्व धर्माच्या व जातीच्या व्यक्तीं या पुरस्कारासाठी पात्र राहतील.असे ज्येष्ठ पत्रकार ॲड.सीताराम पोकळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. आष्टी तालुक्याच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी हे पुरस्कार देण्यात येतील. सामाजिक कार्य, कृषी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, पत्रकारिता, अध्यात्म, साहित्य, राजकारण, आदर्श ग्रामसेवक ,आदर्श तलाठी, आदर्श अंगणवाडी/ बालवाडी सेविका, आदर्श आशा वर्कर, आदर्श सरपंच ,आदर्श ग्रामसेवक, आदर्श तलाठी, आदर्श वायरमन इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या व्यक्तीसाठी हे पुरस्कार ठेवण्यात आलेले आहेत. अशा व्यक्तीकडून किंवा त्यांच्या सुचकाकडून या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. प्रस्तावासोबत व्यक्ती परिचय, केलेल्या कामाचा तपशील, पुराव्या दाखल बातमीचे कात्रण, फोटो आणि दोन पासपोर्ट फोटो व आधार कार्ड इत्यादी साहित्य पाठवावे.
आलेल्या प्रस्तावाची छाननी निवड समितीच्या समोर करण्यात येईल व त्यातून पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड करण्यात येईल इच्छुकांनी आपले प्रस्ताव ॲड .सीताराम पोकळे पत्रकार मु. पो. बेलगाव ,ता. आष्टी, जि. बीड यांच्याकडे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दिनांक 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत किंवा तत्पूर्वी पाठवावेत .असे आवाहन मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचे सचिव पत्रकार दादा पवळ यांनी केले आहे.
stay connected