*मंथन परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान*
दौलावडगाव प्रतिनिधी..
शिक्षण क्षेत्रातील हुशार विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य तो सन्मान मिळावा या हेतूने दौलावडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मा. महादेव सर्जेराव कोहक यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. आपल्या मुलाच्या वाढदिवस आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा दौलवडगाव येथील मंथन परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान पत्रकार कासम शेख यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री नंदू वाणी सर यांनी केले.महादेव कोहक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले की, “शिक्षण हेच खरे बळ आहे. अभ्यासातील सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा आणि एकाग्रता यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. या यशातून पुढे मोठ्या संधींचा मार्ग खुला होईल.”आपण मिळवलेले घवघवीत यश नक्कीच कौतुकास पात्र आहे आणि विद्यार्थ्यांना लाभलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन पण तितकेच महत्त्वाचे असून त्यांचे पण स्मृतिचिन्ह देऊन श्रीमती ढवळे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.आणि विद्यार्थ्यांनी कामापुरतेच मोबाईलचा वापर करावे असा सल्लाही दिला.भविष्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला माझ्याकडून सायकल बक्षीस दिली जाणार आहे यासाठी आपण आतापासूनच अभ्यासाला लागा असे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते महादेव सर्जेराव कोहक यांनी सांगितले.
सन्मानित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. जि.प.कें.प्राथ. शा.दौलावडगाव येथील केंद्रीय मुख्याध्यापक श्री कुठे सर यांनी मुलांच्या यशाचा अभिमान व्यक्त करत जि.प. मुख्याध्यापक श्री नंदू वाणी सर, श्रीमती ढवळे मॅडम, ढगे मॅडम, यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले तेव्हा आमचे अकरा विद्यार्थी मंथन परीक्षेत पास झाले विशेष म्हणजे आमच्या शाळेतून रेहान शेख हा विद्यार्थी केंद्रात प्रथम आल्याने रेहान बरोबर पालकांचे, शाळेतील शिक्षकांचे आणि गावाचे नावलौकिक झाले.
मा. महादेव कोहक यांच्या अभिनव उपक्रमामुळे गावात शैक्षणिक प्रेरणा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला एक उत्साही वातावरण आले.
stay connected