खुंटेफळ साठवण तलावाच्या पाईपलाईनचे काम जलदगतीने सुरू..
जून महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार...- आ.सुरेश धस
******************************
आ.धस यांचे आजोळात नवसपूर्ती सोहळा,पेढेतूला,मराठवाडा भूषण लोकनेते जयघोषात जंगी स्वागत
******************************
******************************
आष्टी (प्रतिनिधी)
तालुक्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या खुंटेफळ प्रकल्पाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन 5 फेब्रुवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ केला.. त्या दिवसापासून आत्तापर्यंत जे काम सुरू केले ते 70% काम संपले असून पुढच्या चार महिन्यांमध्ये पुनर्वसन आणि भूसंपादन करून जून 2026 मध्ये या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते करणार असल्याचा शब्द देत...आगामी काळात मराठवाड्याला 30 टीएमसी पाणी देण्यास तयार असल्याचे सांगत दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वा सोबत आपण राहिले पाहिजे असे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.
आष्टी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल आ. सुरेश धस यांच्या आजोळ जन्मगाव असलेल्या आष्टी तालुक्यातील चिखली गावात शनिवारी श्री लक्ष्मीआई देवीचा नवसपुर्ती सोहळा आणि धस यांची पेढे तुला करून पुर्ण करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.सदस्य देविदास धस,युवानेते जयदत्त धस,जि.प.सदस्य माऊली जरांगे,गणेश शिंदे,नितीन मेहेर,राजेंद्र दहातोंडे,सभापती बद्रीनाथ जगताप,प्रल्हाद मुळीक,श्याम आबा तळेकर,बंडू तोडकर, ॲड.झांबरे,डॉ.दीपक भवर,नगराध्यक्ष जिया बेग यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,शेतकरी आणि दूध व्यवसाय करणाऱ्यांना दुधाचे उत्पादन वाढवणे यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार असून प्रयोगशाळेच्या माध्यमातून देशी गाईंचे कृत्रिम रेतन करून दुग्ध व्यवसायात प्रगतीकडे नेण्याचा माझा मानस आहे.आणि त्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.या सह शेतीकरिता जलसिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे धस सांगत विधानसभा निवडणुकीपूर्वी,माझे आजोळ आणि जन्मस्थळ असलेल्या चिखली गावातील श्री.विलास शिंदे व श्री.रामदास शिंदे सह चिखली ग्रामस्थांनी मी आमदार झालो पाहिजे यासाठी गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी मातेला नवस बोलला होता.विधानसभा निवडणुकीत जर मी आमदार झालो तर देवीच्या मंदिरात माझी पेढे तूला करू असा नवस होता. श्री.लक्ष्मीआई देवी आणि तमाम आष्टी विधानसभेतील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार झालो.तोच नवस फेडण्यासाठी आज समस्त ग्रामस्थ, चिखली यांच्या वतीने माझी पेढे तुला करण्यात आली.याशिवाय,श्री. भगवान तांबे यांनी देवीला १०१ नारळाचे तोरण बांधले,माझे स्नेही श्री.सुनिल कुलकर्णी यांनी ग्रामस्थांसाठी भोजनाची व्यवस्था केली.मामाच्या गावाने फुलांनी सजवलेल्या बैलगाडीत बसवून ढोल ताशे वाजवत, फुलांचा वर्षाव करत माझे स्वागत केले.या स्वागताने मी अगदी भारावून गेलो.बालपणीच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेल्याचे सांगत मी लहाणापासून थोरांपर्यंत सर्वांचे मनापासून आभार मानत माझे लहानपणीचे सवंगडी,लहानपणीच्या आठवणी आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या गावातील जेष्ठांच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला असल्याचे सांगत धस यांनी चिखली ग्रामस्थांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळासाहेब तळेकर यांनी प्रास्ताविक अंगद शिंदे यांनी मानले यावेळी प्रास्तविक पर गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
आमदार सुरेश धस यांनी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवल्याबद्दल जन्मभूमी आजोळ चिखली येथे नवस्फुर्ती सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.यावेळी संपूर्ण गाव एकवटले पाहायला मिळाले तर यावेळी लेझीम पारंपारिक वाद्य वाजवत आ.धस यांचे स्वागत करण्यात आले.मराठवाडा भूषण आमदार सुरेश धस या नावाने बैल जोडी सजवलेल्या बैलगाडी, लहानग्यानी गुलाबाचे फुले देऊन आ.धस यांचे स्वागत केले.आ.सुरेश धस यांच्या वजना एवढे ११ ब्राम्हनाच्या उपस्थित विधीवत पेढेतुला करण्यात आली. आ. सुरेश धस यांनी देखील ग्रामस्थांसोबत ढोल वाजवत ठेका धरला.
दहा वर्षांत या खुंटेफळ साठवण प्रकल्पासाठी दोन्ही माजी लोकप्रतिनिधीनी केवळ दोनच टक्के काम केले.त्यामुळे त्यांना पाण्याचे महत्व किती होते हे यावरून सर्वांच्या लक्षात आले असल्याचे सांगत आ.सुरेश धस यांनी माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.बाळासाहेब आजबे यांना नाव न घेता टोला लगावला.
अहोरात्र सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत कामाला यावं लागत सुखात दुःखात लोकांच्या सोबत रहाव लागत जनतेची नस ओळखून कामाची चुणूक दाखवावी लागते आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असावे लागते ना कुठली संस्था,ना कुठले कारखाने तरीही जनतेच्या मनातील हृदय सम्राट होता येत असल्याचे मत आ.सुरेश धस यांनी व्यक्त केले.
अन्यायाच्या विरोधात उभा ठाकलो आणि नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येला वाचा फोडत गुन्हेगारांवर कठोर शासन होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.त्यामुळे मतदारसंघातील तमाम जनतेने आपण योग्य माणसाची निवड केल्याची भावना व्यक्त केली त्याचाच परिणाम म्हणून सबंध महाराष्ट्राला माझी एक वेगळी ओळख या माध्यमातून निर्माण झाली.






.jpg)
stay connected