*कर्तव्य आणि माणुसकीचे नाते – अंभोरा पोलीस स्टेशनचा उपक्रम*
मुसळधार पाऊस होऊन महापूर आल्याने अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक निष्पाप व सामान्य नागरिकांचे संसार अक्षरशः उध्वस्त झाले. घरदार वाहून गेले, छप्पर निघून गेले, शेतमाल व जनावरे वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहे.
या संकटसमयी पोलिसांचे कर्तव्य फक्त कायदा-सुव्यवस्था राखणे नाही, तर आपल्या हद्दीतील नागरिकांना धीर देणे, त्यांच्यासोबत उभे राहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याच भावनेतून अंभोरा पोलीस स्टेशनतर्फे ज्यांना खऱ्या अर्थाने मदतीची आवश्यकता आहे अशा गरजू कुटुंबांना फुल ना फुलांची पाकळी म्हणून किराणा किट वाटप करण्यात येतं आहे. हा उपक्रम म्हणजे मोठ्या मदतीचा डोंगर नव्हे, तर दुःखात थोडासा हातभार, संकटात खारीचा वाटा म्हणुन आधाराचा हात एवढाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या उपक्रमा मागील भावना अशी आहे की, नागरिकांना संकटात एकटे नाही आहोत, हे जाणवावे.पोलिस व जनतेत सुगम संबंध जिवंत राहावेत.समाजात परस्पर सहाय्याची भावना निर्माण होऊन प्रेरणा मिळावी.अंभोरा पोलीस स्टेशन हे केवळ कायदा राखणारे ठिकाण नसून, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे “आश्रयाचे ठिकाण” आहे, हेच या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत, हिच खरी ताकद आहे.अंभोरा पोलीस स्टेशन सुख दुःखात आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे.
(मंगेश साळवे)
stay connected