अंभोरा पोलिसांचा पुन्हा 'पंधरा जुगारींना' दणका धानोऱ्यात 13 तर कोल्हेवाडीत 15 जणांवर कारवाई* ---------------------- कोल्हेवाडीत पोलिसांकडून पाच लाख 64 हजाराचा मुद्देमाल जप्त तर धानोऱ्यात 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त

 

*अंभोरा पोलिसांचा पुन्हा 'पंधरा जुगारींना' दणका धानोऱ्यात 13 तर कोल्हेवाडीत 15 जणांवर कारवाई*
----------------------
कोल्हेवाडीत पोलिसांकडून पाच लाख 64 हजाराचा मुद्देमाल जप्त तर धानोऱ्यात 4 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त



------------------
कडा /वार्ताहर
-----------------
तालुक्यातील कोल्हेवाडी येथे पैशावर तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर अंभोरा पोलिसांनी छापा मारून 5 लाख 64 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पंधरा जुगाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल कारवाई केली.



आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हेवाडी परिसरात तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार सपोनी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके यांच्यासह पोलिसांनी जुगारीच्या अड्ड्यावर छापा मारून दुचाकी, मोबाईल पत्त्याच्या साहित्यसह पंधरा जुगाऱ्यांना जागीच पकडले. त्यांच्याकडून पाच लाख 64 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अंभोरा पोलिसांकडून सांगण्यात आले.



------------------------
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैद्यांनी बाजार थाटला असला तरी आष्टी, कडा पोलीस मात्र अंभोऱ्याच्या बातम्या वाचून दात काढीत आहेत. कडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास पंधरा ठिकाणी जुगारीचे अड्डे चालू आहेत. गणेशोत्सवात अनेक हॉटेल, ढाब्यावर अवैध दारूची बिनबोभाट विक्री चालू आहे. दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत आहे. याची मलिदा गोळा करणाऱ्या लक्ष्मी भक्तांना माहिती असून देखील कड्याचे पोलीस अर्थपूर्ण दक्ष दुर्लक्ष करीत आहेत.
-------%%------



*अंभोरा पोलीस स्टेशनचा धानोरा येथे जुगारीना दणका, पुन्हा एकदा 13 जुगारींवर कारवाई,  4,30,930/-रुपयांचा मुद्देमाल जप्त*

मा. पोलिस अधीक्षक नवनीत सर, मा. अप्पर पोलिस अधीक्षक सचिन सर तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मंगेश, पोउपनि चंद्रकांत तावरे व अंमलदार 355/सतीश पैठणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धानोरा येथील शेतातील जुगार अड्ड्यावर सापळा रचून धाड टाकण्यात आली. या धाडीत 13 जणांना कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून  4,30,930/- रुपये किमतीचा मुद्देमाल (रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल, पत्ते इत्यादी साहित्य) जप्त करण्यात आले आहे.आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये अंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे करीत आहे.
सदरची कारवाई अंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी API मंगेश, PSI चंद्रकांत,  PC सतीश, HG बाळू, घुले व बोडखे यांनी केली आहेत.
----------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.