अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी प्रेम पवळ यांची निवड
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावातील प्रेम पवळ अर्थातच प्रितम सोन्याबापु पवळ हे एका सेवानिवृत्त आरोग्य सेवक कर्मचारी अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती आहेत ते दै.पुढारी मराठी वृत्तपत्रचे सुद्धा आष्टी तालुका प्रतिनिधी म्हणून काम पहातात काल झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोर कमेटीत प्रेम पवळ यांना आष्टी तालुकाध्यक्षपदी प्रेम पवळ यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक व साहित्यक्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेऊन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शरद गोरे यांनी ही नियुक्ती केली आहे.
त्यांचे आजपर्यंत सहा काव्यसंग्रह प्रकाशित असुन त्यांना आठरा राज्यस्तरीय पुरस्काराने देखील ते सन्मानीत आहेत याचीच दखल घेत दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, या पदाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंतचा असेल. आता परिषदेचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. सुदृढ समाजनिर्मितीसाठी ते अविरत कार्यरत राहतील, अशी अपेक्षा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याद्वारे सात्विक सुविचारांची पेरणी करून समानतेचा मळा फुलवला जाईल, यावर परिषदेचा विश्वास आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
stay connected