वात्सल्य व जिव्हाळ्याचे मुर्तीमंत व्यक्तीमत्व स्व.कासुबाई बांगर भागवताचार्या ह.भ.प. डॉ. सविताताई शास्त्री महाराज

 वात्सल्य व जिव्हाळ्याचे मुर्तीमंत व्यक्तीमत्व स्व.कासुबाई बांगर
भागवताचार्या ह.भ.प. डॉ. सविताताई शास्त्री महाराज  



आष्टी  प्रतिनिधी- 

मातावळी येथील कै.कासुबाई बांगर यांनी मुले आणि नातेवाईकांवर चांगले संस्कार करीत चांगली संस्कारक्षम पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण काम केले.वात्सल्य व जिव्हाळ्याचे मुर्तीमंत व्यक्तीमत्व स्व.कासुबाई बांगर होत्या असे प्रतिपादन भागवताचार्या ह.भ.प. डॉ. सविताताई शास्त्री महाराज यांनी केले. 

       आष्टी तालुक्यातील मातावळी येथील रहिवासी हरिनारायण स्वामी विद्यालयालतील शिक्षक  पंजाब बांगर सर यांच्या मातोश्री  स्व. कासुबाई आश्रुबा बांगर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयातील सर्व शिक्षक,मातावळी येथील राजीव गांधी विद्यालयातील सर्व शिक्षक,ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह सरपंच, माजी सरपंच, ग्रामस्थ,नातेवाईक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने ह.भ.प. डॉ. सविताताई शास्त्री  महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. पुढे बोलताना ह.भ.प. डॉ. सविताताई शास्त्री महाराज यांनी सांगितले की,कै.कासुबाई बांगर यांनी शुन्यातून विश्व निर्माण करीत कुटुंबाला पुढे नेले. आई हे नांव खुप मोठे आहे,त्या नांवाशी कोणीही तुलना करु शकत नाही.आईचे महत्त्व हे गेल्यानंतरच महत्व कळते.कै.  कासुबाई या जुन्या पिढीतील सुसंस्कारित माळकरी,वारकरी महिला होत्या. लोकसंस्कृती जपणाऱ्या शांत,संयमी व अध्यात्म विचाराच्या होत्या. लोक साहित्याचा अनमोल ठेवा त्यांच्याकडे होता.जात्यावरचे गीते,नागपंचमीचे गीते,हळदी प्रसंगी म्हटली जाणारी गीते, लग्न विधी गीते अशा अनेक लोकगीतांचा खजिना कासुबाई यांच्या रूपाने काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी आपले कुटुंब एकसंघ ठेवले.त्यांनी नातेवाइक व मातावळीतील कोणाचाही कधी  तिरस्कार केला नाही.शेवटपर्यंत आनंदी आणि समाधानी जीवन जगल्या.त्यांचा कुटुंबातील सदस्यांना प्रेमाचा धाक होता. कासुबाई या गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असत.कार्य सहभागी त्यांच्यापाठीमागे पंजाब बांगर सर हा मुलगा व नातेवाईकांनी चांगली पिढी घडविण्याचे कार्य सुरुच ठेवले आहे. अकुंश आश्रुबा बांगर,पंजाब आश्रुबा बांगर सर,मनिषा शहादेव जायभाये हे मुले मुली आहेत.सुना नातवंडे आहेत. याप्रसंगी अनेकांनी श्रद्धाजली आर्पण केली.प्रथम पुण्यस्मरणास ‌सामाजिक,राजकीय,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह बांगर कुटुंबायाचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.