भगवान महाविद्यालयात प्रेमचंद जयंती साजरी

 भगवान महाविद्यालयात प्रेमचंद जयंती साजरी



---------------------------------

आष्टी दि. (प्रतिनिधी) येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या भगवान महाविद्यालयामध्ये गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

     महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ. आप्पासाहेब टाळके यांनी हिंदी साहित्यामध्ये प्रेमचंद यांचे किती मोलाचे योगदान आहे याविषयी विचार व्यक्त केले. आदर्शोन्मुख यथार्थवाद या विचारावर आपल्या साहित्याची निर्मिती करून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहेत. त्यानुसार आपण चालण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानदेव वैद्य यांनीही अध्यक्षीय समारोप करताना भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रेमचंद यांनी दिलेले योगदान यावर भाष्य केले.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हिंदी विभागाचे प्रा. श्रीरंग पवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. नामदेव वाघुले, डॉ. अनिल हजारे व डॉ. शत्रुघ्न करडुळे यांचे हिंदी विभागाला सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.