सरकारने भारतरत्न देऊन लोकशाहीर साहित्य रत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करावा.....विनोद थोरात
शोषित पीड़ित वंचित कामगार याच्यासाठी मोठा लढा उभारुन लेखन कविता पोवाडा लोकनाट्याच्या माध्यमातुन सामाजिक क्रांतिचे रणशिंग फुकुन दिड दिवस शाळेत गेलेल्या डॉ आण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस उपन्यास तेरा लोकनाट्य पंधरा शाहिरी पोवाडे तेरा कहानी संग्रह सात चित्रपटाची कथा एक शाहिरी पुस्तक असलेला अनेक पुस्तकाचे व कांदबर्याचे लिख ण लोकशाहीर साहित्य रत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांनी केले आहे वाटेगाव ते मुंबई पायी पदयात्रा काढण्यात डॉ आण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला जगप्रसिध्द असलेली फकिरा हि कांदबरी अर्पण करणारे जग बदल घालूनी घाव मज सांगुन गेले भिमराव असे म्हणणारे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या १०५ व्या जयंतीदिनी भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मराठवाडा संघटक मा श्री विनोदभाऊ थोरात यांनी केली


stay connected