लोहा शहरात खुल्लेआम अवैध धंदे सुरू; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.

 लोहा शहरात खुल्लेआम अवैध धंदे सुरू; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.



लोहा:-चंद्रकांत वाघमारे  

लोहा शहरात अवैध मटका जुगार राजरोसपणे सुरू झाले आहेत. या मटका जुगारामुळे अनेकांच्या संस्कारांची राखरांगोळी झाली आहे. अनेक अल्पवयीन मुले या वाम मार्गाला गेलेली आहेत. तर, काहींनी जुगारापोटी जीव गमावला असल्याच्या धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत.


मटका जुगारात गुंतवणूक कमी, नफा जास्त या मानसिकतेतून अनेक तरुण पिढीचा या धंद्याकडे कल दिसून येत आहे. युवकांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून होणार्‍या दुर्लक्षामुळे मटका जुगार धंद्याला मोकळे रान मिळाले आहे. तसेच, जे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत या धंद्याना जणु लोहा पोलीसांनी मटका जुगाराला नाहरकत दिली आहे का, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडलेला आहे. युवक या आकडेवारीच्या खेळापोटी तासनतास वाया घालवत आहे. त्यामुळे युवक कर्जबाजारी व नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या अवैध धंद्यांमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. या अवैध धद्यांबाबत आरडाओरडा झाल्यास तात्पुरते धंदे बंद ठेवले जातात व परिणामी छुप्या पद्धतीने धंदे चालविले जातात. आणि पुन्हा काही दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे असते. आता तरी जिल्हा पोलिस प्रशासन या अवैध धंद्यावर कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.

लोहा शहर हे अवैध धंदे चालकांचे माहेरघर झाले असुन बिनदिक्कतपणे मटका, जुगार चालू असल्याने शहरात पोलीसांचा धाक राहीला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोहा तालुका मागील अनेक दिवसापासून अवैध वाळूसाठी चर्चेत आला आहे. त्यातच ग्रामीण भागासह शहरांमध्ये अवैध धंद्याने डोके वर काढले आहे.कहर म्हणजे शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये सर्रास मटका चालक खुल्याआमपणे चिट्टी देऊन मटका घेत असल्याने नेमकं या अवैध धंद्यांना अभय कोणाचं मिळाले आहे अशी चर्चा सामान्य लोक करत आहेत.लोहा तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री व मटका बुकीच पेव फुटलं आहे. घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीं या जुगार व व्यसनांच्या आहारी जात असल्याने गावागावात कलह व सामान्य लोकांचे संसार कुटुंब उध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


लोहा शहरांमध्ये अनेक ठिकाणी पान टपरी व बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्रासपणे चिट्टी देऊन मटका जुगार चालू असल्याचे चित्र आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता दिसून आले. ग्रामीण भागामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिबंधित असणारा गुटखा ही किराणा दुकानांमध्ये उपलब्ध झाला असुन याचे व्यसनही लहान शाळकरी मुलांपर्यंत पोहोचले आहे. पोलीस प्रशासनाची वचक अवैधधंदे चालकावर राहिली नसल्याने ते बिंदिकतपणे हा व्यवसाय चालवत असल्याचे चित्र असून प्रशासनाने वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.