भीषण अपघातात आई- वडील गमावलेल्या निष्पाप लेकरांसाठी परमेश्वर येवले पाटील यांचा एक लाख रुपयाचा जीवनदायी मदतीचा हात आणि समाजाला एकजुटीचा संदेश

 *भीषण अपघातात आई- वडील गमावलेल्या निष्पाप लेकरांसाठी परमेश्वर येवले पाटील यांचा एक लाख रुपयाचा जीवनदायी मदतीचा हात आणि समाजाला एकजुटीचा संदेश*




पाटोदा *(गणेश शेवाळे)* माणुसकी अजून जिवंत आहे, हे दाखवून दिले आहे समाजहितासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या परमेश्वर येवले पाटील यांनी. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हळहळून गेला होता.काही दिवसांपूर्वी बाळू केशव वायकर व त्यांची पत्नी लता बाळू वायकर हे पाटोदा येथे बाजारासाठी दुचाकी वरून जात असताना, पाटोदा शहराजवळ भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आई- वडिलांच्या मायेच्या सावली शिवाय आयुष्याचा प्रवास सुरू करावा लागणार असल्याने गावभर हळहळ पसरली.या दुःखद प्रसंगाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी व लोकहिताची तळमळ जपणारे समाज सेवक परमेश्वर येवले पाटील स्वतः घाटेवाडीत दाखल झाले. त्यांनी या चिमुकल्यांच्या भविष्यासाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ सुपूर्द केली. मदत करताना परमेश्वर येवले पाटील म्हणाले "या दोन चिमुकल्यांना केवळ पैशांची नव्हे, तर प्रेम, आधार आणि सुरक्षित भविष्याची गरज आहे. आपल्या समाजातील प्रत्येक दानशूर व्यक्तीने या मुलांसाठी पुढाकार घेतला, तर यांचे आयुष्य उजळून निघेल. समाजाने अशा प्रसंगी एक दिलाने उभे राहणे हीच खरी मानवतेची ओळख आहे."त्यांचे हे शब्द केवळ त्या क्षणापुरते नव्हते, तर संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारे होते. कारण अपघात केवळ मृत्यू घडवत नाहीत, तर मागे उरलेल्या जिवांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या गरजांसाठी झटणारा, सर्वसामान्यांच्या अडचणी आपल्या अडचणी मानणारा आणि वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणारा नेता म्हणून परमेश्वर येवले पाटील यांची ओळख आहे. शेतकरी, गरिब, विधवा, अपंग, शिक्षण घेणारे विद्यार्थी, नैसर्गिक आपत्तीतील पीडित अशा अनेकांना त्यांनी नेहमी मदत केली आहे. घाटेवाडीतील या चिमुकल्यांसाठी दिलेली मदत केवळ आर्थिक नाही, तर संपूर्ण समाजात माणुसकीचा संदेश पसरवणारी आहे.या मदतकार्यावेळी अशोक दादा शिंदे, राहुल बप्पा शिंदे, बाबुराव बावणे,भरत आरसुळ,संग्राम आरसुळ यांसह इतर मान्यवर, मित्र परिवार आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी परमेश्वर येवले पाटील यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.या घटनेतून आपल्याला दोन मोठे संदेश मिळतात रस्ते सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.व अडचणीत असणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे कारण माणुसकी हीच खरी संपत्ती आहे. घाटेवाडीतील वायकर कुटुंबाच्या चिमुकल्यांसाठी मदतीची परमेश्वर येवले पाटील यांनी केलेली ही साखळी आता आणखी मजबूत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण जेव्हा समाज आणि संवेदनशील नेते एकत्र येतात, तेव्हा कोणतेही दुःख हरवणे कठीण नसते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.