कड्याचे माजी सरपंच संपतदादा सांगळे यांचे निधन
--------------------
कडा /वार्ताहर
-------------------
येथील माजी सरपंच संपत दिनकरराव सांगळे यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे (वय- 49) होते.
दिवंगत संपत दादा सांगळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, एक भाऊ असा परिवार आहे. अत्यंत शांत, संयमी मितभाषी आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची आष्टी तालुक्यात ओळख होती. कडा येथील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
------***-------
stay connected