म्हसोबावाडी येथील विद्यार्थी पाण्याअभावी करतात तब्बल दिड ते दोन किलोमीटरवर पायी प्रवास ...
लोक प्रतिनिधी यांचे होते वारंवार दुर्लक्ष
आष्टी (प्रतिनिधी)
तालुक्यातील म्हसोबाचीवाडी हनुमान नगर{पांढरी}येथील लोकवस्ती व या ठिकाणी असणारं पुरातन पावन हनुमान मंदिर आहे...पण अडचण अशी की या वस्तीला चहू बाजूंनी कमलेश्वरी नदीचा वेढा आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येण्यासाठी व 60/70 लोकसंख्या असलेल्या येथील लोकवस्तीतील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे...शालेय विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी जीवाशी खेळून नदीपात्र पार करून शाळेत जावं लागतं येथील लोकवस्ती वरील लोकांना विशेषतः पाऊस कल्यातिल 4/6 महिने हे जिवाशी खेळून काढावे लागतात रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींसाठी जाणंयेणं करावं लागतं शेतीसाठी आवश्यक असणारे साधनं या वस्तीला नदीमुळे वेळेला हजर होत नाहीत म्हणुन लोकवस्तीतील लोकांचे अर्थकारण ही खुप धोक्यात येत आहे... या विषयीक अडचणीचे वेळोवेळी पाठपुरावे करून देखील तालुका लोक प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत..या ठिकाणी असणाऱ्या सर्व लोकवस्ती वरील लोकांची अशी अपेक्षा आहे की या गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावे व ही समस्या सोडवावी या वस्ती वरील लोक व शेतकरी शंकर एकनाथ शेकडे,ब्रम्हदेव एकनाथ शेकडे,नामदेव देवराम शेकडे,गोरख एकनाथ बडे,विठ्ठल एकनाथ बडे,पोपट आश्रुबा शेकडे,सुभाष आश्रूबा शेकडे,रावसाहेब आश्रुबा शेकडे, शिवदास आश्रुबा शेकडे,संजय सुंदर शेकडे, राजु सुंदर शेकडे ,आजीनाथ भाऊराव शेकडे, सुदाम गहिनीनाथ शेकडे सह सर्व महिला व विद्यार्थी सह आमचे प्रतिनिधी -प्रेम पवळ उपस्थित होते.
stay connected