कड्यात डीवायएसपींच्या पथकाकडून जुगारींवर कारवाई

 कड्यात डीवायएसपींच्या पथकाकडून जुगारींवर कारवाई 

------------------



पोलिसांकडून 16, 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त  

----------------

कडा / वार्ताहर 

----------------

येथील कडी नदीच्या परिसरात गोलाकार बसून तीरट नावाचा जुगार पत्त्यावर पैसे लावून खेळणाऱ्या पाच आरोपींवर डीवायएसपींच्या पथकाने कारवाई करून 16, 220 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.


याबाबत पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, आष्टीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला कडा येथील नदीपात्राच्या परिसरात तीरट नावाचा जुगार पैशावर खेळत असल्याची गोपनीय माहिती पथकाला  खबऱ्याकडून मिळाली. त्या आधारे पथकाने छापा मारून 16 हजार 220 रुपये नगदी जप्त करून पाच जुगारींवर कारवाई केली. आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा डोके, पोलीस नाईक राम आगरकर, घोळवे यांनी पाच आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. मात्र बाळस धरलेल्या इतर मलाईदार अवैध धंद्यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डीवायएसपींच्या पथकालाच जर कड्यात येऊन कारवाई करावी लागत असेल तर मग स्थानिक पोलीस नेमके काय करतात, याबाबत नागरिकात उलटसुलट चर्चा होत आहे.

---------%%-----



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.