जीवनातील गेलेला क्षण पुन्हा येत नाही पण छायाचित्राकार हा छायाचित्राच्या माध्यमातुन तो क्षण कायम टिकून ठेवतो* शंकर देशमुख

 *जीवनातील गेलेला क्षण पुन्हा येत नाही पण छायाचित्राकार हा छायाचित्राच्या माध्यमातुन तो क्षण कायम टिकून ठेवतो* शंकर देशमुख 

——————————————

भाजपच्या वतीने कडा येथील छायाचित्रकारांचा सत्कार संपन्न

——————————————-


कडा ( वार्ताहर):-  जीवनातील गेलेला क्षण पुन्हा येत नाही पण छायाचित्राकार हा छायाचित्राच्या माध्यमातुन तो क्षण कायम टिकून ठेवतो जागतिक छायाचित्रकार दिना निमित्ताने बोलताना बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख म्हणाले 

जागतिक छायाचित्रकार दिना निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांच्या वतीने कडा शहरातील छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. कडा येथील भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून 

 सामाजिक कार्यकर्ते बाबुलाल भंडारी, अमोलक शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा, राजु शिंदे , दिलीप परदेशी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख, अशोक पवळ, वेदांत देशमुख, रमेश भोजने, , हरिश्चंद्र बोडखे, पत्रकार दिगंबर बोडखे, राजेंद्र जैन, अशोक खंदारे, महेश पवळ व इतर उपस्थित होते. 

उपस्थित होते.  



प्रारंभी फोटोग्राफर ढोले यांच्याकडील अत्यंत जुन्या काळातील व सध्या असणाऱ्या अशा दोन्ही कॅमेरांची पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.सुरुवातीला कडा येथील जेष्ठ फोटोग्राफर अरुण ढोले यांचा सत्कार करण्यात आला.

  याप्रसंगी सागर ढोले,अतुल ढोले,विशाल इथापे,अशोक कुमखाले,विशाल ढोले,अंबादास जगताप,रोहन बेल्हेकर,उमेश कव्हले,किरण शिंदे,प्रेमराज साळवे,कृष्णा अब्दार,रोहित क्षिरसागर,गायकवाड,राहुल ढोले,संस्कार पगारे,शुभम साके, अंकूश चव्हाण, साठे, कांबळे व इतर उपस्थित छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबुलाल भंडारी, हेमंत पोखरणा यांची शुभेच्छापर भाषणे झाली.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांनी सांगितले की, छायाचित्रकार हा सर्वसामान्य माणसापासून ते अति महत्वपूर्ण अशा व्यक्तींचे महत्त्वाचे क्षण कॅमेरा मध्ये बंदीस्त करण्याचे काम करतात. माणसाच्या आयुष्याची आठवणी कायम स्मरणात राहतील असे महत्वाचे क्षण टिपण्याचे प्रयत्न करतात तसेच निसर्ग चित्र सजिव वाटतील असे काम छायाचित्रकार करतात. त्यांचे हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर ढोले यांनी केले.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.