विकासभू सरपंच नंदकुमार गोरे यांची जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती बिनविरोध निवड

 *विकासभू सरपंच नंदकुमार गोरे यांची जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती बिनविरोध निवड*



पाटोदा (प्रतिनिधी) जनतेच्या मनात घर करून, शून्यातून विश्वनिर्माण करणारे नेते आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचे कट्टर समर्थक नंदकुमार (आबा) गोरे यांची जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आपटी गावासह जामखेड तालुक्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचा आधारस्तंभ गेल्या काही वर्षांत सरपंच म्हणून गावात रस्ते,पाणीपुरवठा,शाळा दुरुस्ती, स्वच्छता मोहीम, महिला बचत गट उभारणी अशा अनेक विकास कामांमध्ये गोरेंनी मोलाचा वाटा उचलला आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे, पिकांना बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, आणि कृषीक्षेत्रात नव्या योजना राबविणे यामुळे त्यांनी शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन केला आहे.मला पाठिंबा देणाऱ्या संचालक मंडळाचे, ग्रामस्थांचे आणि सभापती साहेबांचे मी आभार मानतो. शेतकरी हितासाठी, पारदर्शक व्यवहारांसाठी आणि आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन,” अशी प्रतिक्रिया नंदकुमार (आबा) गोरे, उपसभापती, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती.यांनी दिली गोरे यांच्या निवडीने जामखेड तालुक्यासह आपटी गावात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणात अभिनंदन संदेशांचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.