साबलखेड ते अहिल्यानगर रस्ता कामाच्या नावाखाली पूर्ण रास्ता उखडून ठेवल्याने प्रवासी व वाहनधारकांची तारांबळ
आष्टी प्रतिनिधी - आष्टी तालुक्यातुन जाणारा जामखेड ते अहिल्यानगर या महामार्गाच्या प्रथम टप्पा चिंचपूर ते सबलखेड या साधारण ३५-४० किलोमीटरच्या रस्त्याचे काम तीन चार वर्षांपासून सुरु आहे ते काम अद्यापही पूर्ण झाले नसून त्याचा नाहक त्रास प्रवास करणाऱ्यांना होत होता तो कमी म्हणुन की काय आता साबलखेड ते अहिल्यानगर रस्त्याच्या कामाला मोठी घाई करून भर पावसाळ्यात सुरवात केली आहे. हा साबलखेड ते अहिल्यानगर रस्ता दोन -तीन वर्षापूर्वीच डांबरीकारण केलेला चांगल्या स्थितीतला रस्ता होता लगेच गरज नसताना पावसाचे दिवस असताना घाईघाईणे पूर्ण पणे उखडण्याच्या कामास सुरुवात केली आहे, सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्ता पूर्णपणे उखडून त्यावर मातीचा भराव टाकल्याने संपूर्ण रस्ता सर्वत्र खचत आहे व चिखलमय झाला आहे, त्यावर टू व्हीलरने ये जा करणाऱ्यांच्या टू व्हीलर घसरत आहेत, अनेक ठिकाणी दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडल्या आहेत, तर रस्ता चिखलमय झाल्यामुळे मोठाले वाहने सुद्धा चिखलात फसत आहेत, त्यामुळे रस्ता ए -जा करणाऱ्यासाठी अचानक कधीही बंद पडत आहे, व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होत आहे, तरी या कंत्राटदाराने सर्वच रस्ता न उखडता पाच ते दहा किलोमीटरचे टप्पे करून तो पूर्ण करूनच पुढचा रस्ता उघडण्याला सुरुवात करावी, नसता एखादा अपघात घडला, दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे, तरी संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ये -जा करणाऱ्या प्रवाशी व वाहनचालक यांना त्रास होणार नाही याबाबत योग्य त्या सूचना संबंधित ठेकेदार व अभियंता यांना कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.


stay connected