*कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाला आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एनजीपी 5879 चा राज्यभर जाहीर पाठिंबा* .

 *कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाला आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एनजीपी 5879 चा राज्यभर जाहीर पाठिंबा* .....


                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

नांदेड : - चंद्रकांत वाघमारे 

दि.19 आगष्ट रोजी पासून सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले असुन प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषणाला  सुरुवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून दि.19 आगष्ट रोजी नांदेड जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणस्थळी म.रा.आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एनजीपी 5879 चे राज्याध्यक्ष दिनानाथ जोंधळे, राज्य महासचिव सुरेशदादा आरगुलवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख देविदास पेंढारकर, कंत्राटी आरोग्य कर्मचारी संवर्ग शाखेचे राज्य सचिव यशवंत पदरे , हिवताप विभाग संवर्ग शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुदास गलपवाड यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंब्याचे पत्र उपोषणार्थी कर्मचाऱ्यांना सुपुर्द करण्यात आले. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटनेचा राज्यभर जाहीर पाठिंबा असुन राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष दिनानाथ जोंधळे व राज्य महासचिव सुरेशदादा आरगुलवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.