एसटी मेकॅनिक गुणवंत एच.मिसलवाड यांना जागतिक आदिवासी दिनी आदिवासी कोळी महादेव समाज भूषण पुरस्कार प्रदान


एसटी मेकॅनिक गुणवंत एच.मिसलवाड यांना जागतिक आदिवासी दिनी
आदिवासी कोळी महादेव समाज भूषण पुरस्कार प्रदान



नांदेड  -  जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने दि.9 ऑगस्ट 2025 शनिवार रोजी दुपारी ठिक 2 वाजता हॉटेल राजयोग पॅलेस नमस्कार चौक, नांदेड येथे जिल्ह्यातील तमाम आदिवासी कोळी महादेव जमातींच्या गुणवंत विद्यार्थी (शैक्षणिक), नवनियुक्त कर्मचारी व आदर्शयुक्त समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यामध्ये शैक्षणिक विद्यार्थी-विद्यार्थीनी 70, नवनियुक्त कर्मचारी 20, समाजभूषण पुरस्कारर्थी 5, एकुण पुरस्कारर्थी 95 जणांचा यावेळी गौरव सन्मान करण्यात आला. यापैकीच एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांना त्यांच्या कार्याबद्दल एसटी महामंडळाच्या आस्थापनेबरोबरच आदिवासी कोळी महादेव समाजामध्ये ते नेहमीच सक्रिय राहून मोठे कार्य योगदान देत असतात. याचाच एक भाग म्हणून आज त्यांची आदिवासी कोळी महादेव समाज तमाम नांदेड जिल्ह्याच्यावतीने निवड करून समाजाचे ज्येष्ठ नेते मा.श्री.यादवराव तुडमे व सर्व मान्यवरांच्या हस्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांचा शाल, पुष्पहार, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

यावेळी विचारपीठावर समाजाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. नागनाथरावजी घिसेवाड, यादवरावजी तुडमे, चंद्रकांत गुंगेवाड, रमेश पिठ्ठलवाड, शशिकांत भुसेवाड, आनंदा रेजीतवाड, केरबा जेठेवाड, वसंतराव कलंबरकर, प्रा.धाराशिव शिराळे, चंद्रमोहन चिंतल, वीरभद्र मिरेवाड, भालचंद्र मोळके, संयोजन समितीचे मुख्य माधव रेड्डेवाड, प्रा.ज्ञानेश्वर मरकंठे,  दादाराव कोठेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरील सर्व मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक दादाराव कोठेवाड यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर मरकंठे यांनी केले. आभार प्रदर्शन माधव रेड्डेवाड यांनी मांडले. या कार्यक्रम सोहळ्यास संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील समाज बंधू-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लगेचच अल्पोउपहाराचा स्वाद सर्व उपस्थितांनी घेतला.


------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.