कडा- धामणगाव मार्गावरील देवीनिमगाव पूल पाण्याखाली --------------------- वाहन चालकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा- अंभोरा पोलीस

 कडा- धामणगाव मार्गावरील देवीनिमगाव पूल पाण्याखाली 
---------------------
वाहन चालकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा- अंभोरा पोलीस 


 

----------------

राजेंद्र जैन /कडा  

---------------

तालुक्यातील धामणगाव परिसरात सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस झाल्याने कडा- धामणगाव मार्गावरील देवीनिमगाव येथील वाहतुकीचा पूल पाण्याखाली गेला असून, पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा. असे आवाहन अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी केले आहे.


आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात मागील दोन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक नद्यांचे पाणी पातळीत वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास कडा- धामणगाव मार्गावरील देवीनिमगाव येथील नदीला पूर आल्याने हा अख्खा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. देवीनिमगावच्या नदीला पूर आल्याची माहिती मिळताच, अंभोरा पोलिसांनी भर पावसात हजेरी लावून वाहनधारकांना पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत सूचना करून वाहनधारकांनी पाण्याचा अंदाज नसल्याने पाण्यात वाहन घालण्याचे धाडस करू नये. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

-------%%---------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.