क्रांतीसिंह नाना पाटिल हे प्रती सरकार स्थापन करून रयतेची
सेवा करणारे थोर क्रांतीकारक-गुणवंत एच.मिसलवाड
नांदेड - आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महान क्रांतीकारक झाले, 1942 च्या नंतर ब्रिटिशांविरूद्ध चले जाव चळवळीला प्रारंभ झाला. अशातच क्रांतीसिंह नाना पाटिल यांनी प्रति सरकार (पत्री सरकार) स्थापन करून आपला कारभार लोकाभिमुख करून आपणच चालवणे हे ध्येय उराशी बाळगून प्रति सरकाराअंतर्गत सांगली, सातारा जिल्ह्यातील पंधराशे खेडी गावातील रयतेची सेवा करणारे थोर क्रांतीकारक म्हणजेच क्रांतीसिंह नाना पाटिल हे होत असे प्रतिपादन एसटि मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.03 ऑगस्ट 2025 रविवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता झुंजार नेते, पत्रि सरकार निर्माते, इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे, एक धगधगती मशाल, रयतेचे सेवक, महान क्रांतीकारक, प्रेरणादायी व्यक्तीमत्व क्रांतीसिंह नाना पाटिल यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
सर्वप्रथम रापम आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक मा.श्री.श्रीनिवास रेणके यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटिल यांच्या प्रतिमेचे पुजन करून, पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड यांनी पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की, क्रांतीसिंह नाना पाटिल यांना जेल झाली, नंतर ते भूमीगत राहून प्रति सरकारची सुत्रे हालविली. विनोदाच्या गोष्टींनी व तुफान सेना स्थापन करून युवकांना एकसंघ करून जनजागृती केली. मुंबई येथील शिवाजी पार्कवर भरलेल्या भव्य अशा मेळाव्यात मराठी पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या कार्याप्रती त्यांना क्रांतीसिंह ही पदवी बहाल केली. भारतीय संसदेत दोन वेळा खासदार म्हणून मराठीत भाषण देणारे ते एकमेव खासदार व्यक्ती होते. अशा या महान विभूतींचा तुम्ही-आम्ही सर्वांनीच आदर्श घेवून समाजाप्रती, देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी शेवटी आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्रीनिवास रेणके, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, शिवाई ई-बस कंपनीचे मॅनेजर ज्ञानोबा आढाव, वाहन परिक्षक पंढरीनाथ महाराज मिरकुटे, यांत्रिक सिद्धार्थ जोंधळे, संतोष सोनटक्के, चालक विठोबा वडजे, लिपीक वैशाली कोकणे, श्वेता तेलेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रापम आगारातील कामगार, कष्टकरी कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------------------------------------


stay connected