रिपब्लिकन सेनेची लोहा येथे आढावा बैठक संपन्न.
लोहा:-चंद्रकांत वाघमारे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षाचे नेते आता कामाला लागले असुन यासाठीची मोर्चे बांधनी सुरु झाली आहे. यात आता रिपब्लिकन सेना या पक्षानेही कंबर कसली असुन पक्षाचे सरसेनानी मा. आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्रभर आढावा बैठकिचे आयोजन करण्यात येत असुन नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठक रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव माधव दादा जमदाडे ,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष संजय निळेकर, मराठवाडा उपाध्यक्ष मधुकर झगडे, युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत गोडबोले, युवा जिल्हा उपाध्यक्ष संतोष भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहा येथे नुकतीच संपन्न झाली.
या बाबत अधिक माहिती अशी की येत्या काही दिवसातच जिल्हापरिषद, पंचायत समीती, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगदी उंबरठ्यावर येवून ठेपल्याने राजकीय पक्षाचे नेते राजकीय आखाड्याच्या मैदान तयारीला लागले असुन पुढारी राजकिय समीकरणे जुवळाजळवी करत आहेत. तर आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लावल्याचे दिसत आहेत.
लोहा शहरातील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेची सदस्य नोंदणी व पदाधिकारी यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी लोह्यात आज दि ३ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लीकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रभारी माधवदादा जमदाडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महसाचिव शंकर थोरात, मराठवाडा उपाध्यक्ष मधुकर झगडे,युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले, संजय निळेकर, रंगनाथ जोंधळे,शकिल सय्यद,संतोष भावे, गिरीश भालेराव, पत्रकार बाळासाहेब बुध्दे आदी मान्यवरांची उपस्थीती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष सखाराम सोनवणे यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन संतोष भावे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले आभार प्रदर्शन अंकुश सावते यांनी मांडले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



stay connected