माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची आ.सुरेश धस यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट.. जुन्या स्मृतींना दिला उजाळा

 माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची आ.सुरेश धस यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट.. जुन्या स्मृतींना दिला उजाळा..

**************************



**************************


आष्टी (प्रतिनिधी) 

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे समजले जाणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली..

       आष्टी राज्य परिवहन महामंडळात आगार वाहतूक नियंत्रक मोहिते परिवाराचे नातेवाईक असलेले संजय संभाजीराव निंबाळकर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी ते प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला विजयसिंह मोहिते पाटील यांचे आजोळ असलेले ब्रह्मगाव हे आष्टी तालुक्यात असून आष्टीच्या जवळ आहे. यावेळी आ.सुरेश धस यांनी मोहिते पाटील यांच्याशी संवाद साधताना ..जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष नंतर आष्टी मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याकडे आलो तेव्हा आपल्याकडे या राज्याचे उपमुख्यमंत्रीपद,ग्रामविकास खाते असताना मतदार संघातील कामांना  भरघोस निधी उपलब्ध करून दिला या आठवणींनी उजाळा देत.. आपल्या अद्वैतचंद्र निवासस्थानी आ.सुरेश धस यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा यथोचित सन्मान केला.

यावेळी राजेंद्र सिंह भोसले, राजाभाऊ निंबाळकर,पत्रकार सचिन रानडे उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.