जाटदेवळे येथे रक्तदान, नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

 📰 जाटदेवळे येथे रक्तदान, नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न





जाटदेवळे (डॉ. उद्धव घोशीर) – अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सतत विविध उपक्रम राबवणाऱ्या अनुस्पर्श फाउंडेशन तर्फे जाटदेवळे येथे भव्य रक्तदान, नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. गुरुवर्य मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प. गोविंद महाराज शास्त्री जाटदेवळेकर, ह.भ.प. हरिओम महाराज पवार, सरपंच अंकुश आठरे, माजी सरपंच महादेव रहाटे, सुनील महानोर, डॉ. कल्याण जाधव, डॉ. गर्जे तसेच गावातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर अनेकांनी शुगर, रक्तदाब, नेत्र तपासणी करून घेतली. या उपक्रमात आनंदऋषीजी रक्तपेढी, आनंद ऋषी नेत्रालय अहिल्यानगर व प्राथमिक आरोग्य केंद्र माणिकदौंडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या शिबिरामुळे गावकऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून, अनुस्पर्श फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.