शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय "शब्दगंध सामाजिक कार्य गौरव पुरस्कार" शिरीष थोरवे यांना प्रदान.....
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य यांचे दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद व कवी संमेलन आळंदी देवाची जिल्हा पुणे येथे नुकतेच पार पडले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा दिव्यांग नेते श्री शिरीष (भाऊ)शिवराम थोरवे यांनी समाजाप्रती केलेले कामाची दखल घेतली आहे, त्यांनी आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे तसेच स्वतः 27 वेळा रक्तदान केले.कोविडच्या काळात दिव्यांगांना किराणा,दिव्यांगाचे तपासणी,तीन चाकी सायकल वाटप,मुलांना ड्रेस वाटप यासारख्या अनेक त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय "शब्दगंध सामाजिक कार्य गौरव पुरस्कार 2025" देऊन सामाजिक कार्यकर्त्यांना नवे मापदंड रचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी, सन्मान पत्र देऊन सन्मान केला याप्रसंगी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी,उदागे महाराज संमेलनाध्यक्ष फकीरा पवार(उद्योजक पुणे), प्राचार्य खासेराव शितोळे सर, कवी सांगळे सर, घुले साहेब, संपादक डॉ. कमलकांत वडेलकर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले वरील सन्मानासाठी माजी मंत्री आ.सुरेश(आण्णा)धस माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना, शशिकांत गाडे सर मा.जे.आर. पवार साहेब,माऊली अप्पा जरांगे,डॉ.निंबोरे,इंजि. रमेश ढोबळे पाटील, परमेश्वर शेळके काका, मा.सभापती अंकुशराव चव्हाण,कांतीलाल चनोदीया,दै.सकाळ चे कार्य.संपादक श्री अनील लगड,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल भाऊ सहस्त्रबुद्धे,झुंजार नेता चे उप संपादक मा.उत्तम बोडखे दैनिक पुढारी चे सूर्यकांत वरकड,राजाभाऊ शेळके, सचिन पाटील थोरवे,कृषी भूषण हनुमंतराव गावडे,डॉ अनील गर्जे सर,गोंदकर सर,डॉ हनुमंत काकडे, बाळासाहेब शेंदूरकर सर तसेच धानोरा, खुंटेफळ,सोलापूर वाडी ग्रामस्थ व परिसरातील नातेवाईक व मित्रमंडळी या सर्वांनी शिरीषभाऊ थोरवे यांचे अभिनंदन केले आहे.शब्दगंध परिषदेने एका प्रामाणिक सामा.कार्यकरत्याला न्याय दिल्यामुळे सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.


stay connected