जाटदेवळे येथील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन संपन्न

 *जाटदेवळे येथील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन संपन्न*



जाटदेवळे( डॉ. उध्दव  घोशीर) : जाटदेवळे गावातील अतिशय अशा प्राचीन व सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचे भूमिपूजन आज श्री संत कैवल्यसम्राट ज्ञानेश्वर माऊली यांचा ७५० व्या जन्मोत्सव, गोकुळाष्टमी व भारतीय स्वातंत्र्य दिन अशा मुहूर्तावर मंगलमय वातावरणात ह. भ.प. प्रज्ञाचक्षु  गुरुवर्य मुकुंदकाका  जाटदेवळेकर, ह. भ.प. गोविंद महाराज शास्त्री  जाटदेवळेकर, ह. भ.प. हरिओम महाराज पवार, तसेच गावातील ग्रामस्थ,भक्तगण तसेच सामाजिक बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक पूजा-अर्चा, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधी च्या माध्यमातून संपन्न झाला.




या वेळी उपस्थित प.पूज्य मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे महत्त्व सांगत गावातील एकोपा व भक्तिभाव वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने व देणगीदारांच्या योगदानातून हा जीर्णोद्धार प्रकल्प हाती घेण्यात आला. या कामासाठी अवघ्या अर्ध्या तासामध्ये गावकऱ्यांनी अर्धा कोटी रक्कम जमा केली असून आणखी भरपूर प्रमाणात भक्त देणगीच्या व वर्गणीच्या माध्यमातून मदत करून मंदिर अतिशय भव्य व दिमाखदार अशा नव्या रूपात भक्तांच्या दर्शनासाठी लवकरच सज्ज होणार आहे.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ व श्रद्धावान भाविक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.