वोट चोरी करून आलेलं केंद्राचे आणि राज्यातले सरकार तात्काळ बरखास्त करा-डॉ जितीन वंजारे

 *वोट चोरी करून आलेलं केंद्राचे आणि राज्यातले सरकार तात्काळ बरखास्त करा-डॉ जितीन वंजारे*



बीड प्रतिनिधी:- केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सध्या बीजेपी सरकारची सत्ता असून संबंधी सरकारने देशभरामध्ये वोट चोरी केल्याचे अनेक दाखले समोर येत आहेत, त्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने मतदान आयोगाने लपवलेल्या माहितीबद्दल ताशेरे ओढले असून चक्क निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून पुरावे नष्ट केल्या बाबतची पुरावे उघड झाले आहेत म्हणजेच तुम्ही मतांची चोरी केलेली आहे आणि ती चोरी लपवण्यासाठीच तुम्ही निवडणूक आयोगाच्या याद्याही नष्ट करत आहेत आणि म्हणून एखादा गुन्हा करत असताना तो उघडकीस आल्याचे दिसून आल्यास त्याचे पुरावे नष्ट केल्या बाबतचे सुद्धा गुन्हे संबंधित सरकारवर आणि इलेक्शन आयोगावर दाखल करून केंद्राचे आणि राज्यातलं वोट चोरीच सरकार हटवणं महत्त्वाचं आहे, महामहीम माननीय सुप्रीम कोर्टाने तात्काळ आदेश काढून संबंधित केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार तात्काळ बरखास्त करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक माननीय सम्राट डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.

           महाराष्ट्रामध्ये शेवटच्या उरलेल्या दोन तासांमध्ये साडेसहा लाख मतांची हेराफेरी झाल्याची वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी निदर्शनास आणून देऊन मा. हाय कोर्ट व मा. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आजपर्यंत विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेते मुग घेऊन गप्प होते परंतु भारतातील एकमेव स्वाभिमानी नेता बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात मोठा आंदोलन उभं करून कायदेशीर रित्या लढा उभा केला या लढ्याला यश म्हणून शेवटच्या दोन तासांमध्ये इतकं मतदान वाढलं कसं साडेसहा लाख बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आलं असून काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनीही त्यावर अभ्यास करून एकाच व्यक्तीच्या नावे 20-20 मतदान झाल्याचं उघड केल आहे. काही ठिकाणी एक छोटसं घर त्यामध्ये दोन ते तीन व्यक्ती राहू शकतात अशा घरांमध्ये 50 50 मतदान असल्याचेही निवडणूक आयोगाकडे वोटर्स तयार आहेत याचाच अर्थ भारतामध्ये बीजेपी सरकारला पूरक असं निवडणूक आयोगाने काम केलं असून बोगस मतदार तयार करून भारताच्या निवडणूक आयोगाला पाठीशी धरून वोट चोरी केल्याचं निदर्शनास आलं आहे इतकच नसून इलेक्शन आयोगाचा प्रमुख वोटचोरी करून निवडणूक आयोगाच्या डोळ्यात फुक मारून स्वतःच्या पदाचा राजेंनामा देऊन बाहेरच्या देशामध्ये पळून गेलेला आहे त्याचप्रमाणे ही खोटी चोरी पचवण्यासाठी इलेक्शन आयोगाने त्याच्या साईट वरील काही याद्याच बंद केल्या आहेत, त्या त्या साईटवर माहिती देणे ही बंद केलं गेलं आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग जर खरं असेल तर त्यांना त्यांच्या साईट्स बंद करण्याची गरजच का पडली? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉक्टर जितीनदादा वंजारे  खालापूरकर यांनी विचारला आहे.

              जन सुरक्षा विधेयक समोर आणून भारतातील सर्वच सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संस्था,गोरगरिबांचे कैवारी, गोरगरिबांचे नेते यांच्या वरती सरकार विरोधात बोलल्यामुळे गुन्हे नोंद करून त्यांना जेलमध्ये डांबवण्याचे काम करण्यासाठीच जन सुरक्षा विधेयक संबंधित सरकारने पारित केलं असून ते तात्काळ रद्द करा कारण ही लोकशाही आहे ह्यात सत्ताधारी पेक्षा विरोधी बाकावर बसणाऱ्याला जास्त महत्व आहे कारण लोकशाहीत जनतेचं ऐकलं जातं आणि जनता जनार्धन काय बोलेल हे न एकण्यासाठी गोर गरिबांचा आवाज दाबण्यासाठी, सरकार ला मनमानी करण्यासाठीच जण सुरक्षा विधेयक पारीत केल्याचे दिसून येत आहे. आत्ताची कालची बातमी आहे शेतकरीनेते आदरणीय बच्चूभाऊ कडू यांना तीन वर्षाचा करावास दिला आहे अहो फडणवीस साहेब अजित दादा आणि शिंदे साहेब सजाच द्यायची आहे ना मग द्या ना त्या पैसे बुडव्या कर्जदाराला निरव मोदी ला,विजय मल्ल्या ला आणि घोटाळेबाज मंत्र्यांना सजा द्या ना त्यांची उघडे पडलेले बोन्ड झाकण्यासाठी तुम्ही त्यांना पक्षात घेतलं भ्रष्टाचार करणारी टोळी जमवली आणि गोर गरिबांचे नेते बच्चू भाऊ कडू यांना जेल मध्ये टाकता वा रे सरकार? मतांची चोरी करून झालेले पी एम आणि मतांची चोरी करून झालेले सीएम तुम्ही भारतील नव्हे तर जगातले एकमेव राजकारणी आहात. खोटेपणा लबाडपणा आणि जातीयवादी धर्मवादी भावना मनात ठेऊन कपटी राजकारणी आहात तुम्हाला जनता माफ करणार नाही. याचा शेवट फार वाईट असेल हे नक्की. असो वोट चोरी फक्त महाराष्ट्रात नाही तर संबंध भारतात झाली आहे त्यामुळे हे सरकारच (केंद्राचे आणि राज्यातले) बिनबुडाचे, कायदेबाह्य आणि खोटं सरकार असून ते तात्काळ बरखास्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.