बीड जिल्ह्यात आष्टी येथे हॉटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू
आष्टी प्रतिनिधी- आष्टी येथून काही अंतरावर असलेल्या खडकत रोडवरील एका हाॅटेलवर वेटर म्हणून कामाला असलेल्या ४० वर्षीय वेटरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली आहे.
आष्टी तालुक्यातील खडकत येथे रोडलगत एक हाॅटेल आहे.काही दिवसांपासून इथे सिताराम ढवळे वय ४० वर्ष असलेला गेवराई तालुक्यातील वेटर म्हणून कामाला होता.शुक्रवारी सकाळी त्याचा हाॅटेलवर मृत्यू झाला.घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर त्याना येण्या अगोदर शवविच्छेदन करण्यात आले होते.मृत्यू संशयास्पद असल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी नातेवाईक पोलिस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.
------------------
बीड पोलिसासह आष्टी पोलिसावर राजकीय दबाव. मयत कामगाराचे आई-वडील भाऊ यांनी केले पोलिसावर गंभीर आरोप.
आम्हाला न्याय हवाय म्हणत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या भेटीसाठी बीडमध्ये. जोपर्यंत आमच्या मुलाला ठार मारल्या बाबत गुन्हा दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत अशी नातेवाईकांची भूमिका.यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.


stay connected