सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मिरवणूक संपन्न...
****************************
***************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सप्तशतोकोतर सुवर्ण महोत्सवी.. ७२५ व्या जयंती निमित्त माऊलींची पालखी मिरवणूक आणि वारकरी सांप्रदायिक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते..
या शोभायात्रा आणि दिंडीमुळे आष्टी शहर भक्तिमय झाल्याचे दिसून येत होते.या शोभायात्रेत आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस व नगरपंचायत चे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार बाळ दत्त मोरे यांनी सहभाग झाले होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून.. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर
७२५ व्या सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त राज्यभरातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थां,नगरपंचायत, नगरपरिषद, या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची मिरवणूक आणि वारकरी संप्रदायाच्या जयघोषात दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर आष्टी नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये भाविकांच्या उत्साहात आणि भक्तिभावाने माऊलींचा भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत टाळकरी, वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून "ज्ञानोबा माऊली" आणि "माऊली माऊली"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.. यावेळी हरिभक्त परायण अशोक भोसले महाराज यांच्या श्री संत नामदेव महाराज गुरुकुल पारगाव जोगेश्वरी येथील 35 विद्यार्थ्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला आष्टी शहरातील श्री दत्त मंदिर येथून या पालखी सोहळ्यातील सुरुवात करण्यात आली आणि ही शोभायात्रा दत्त मंदिर गल्ली कसबा पेठ कुंभार गल्ली जैन मंदिर कमान वेस मार्गे मुख्य बाजारपेठ शनी मंदिर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या शोभा यात्रेची सांगता झाली.
या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींचे दर्शन घेत अनेक भाविक भक्तांनी आत्मिक आनंदाचा अनुभव घेतल्याचे पहायला मिळाले
असे प्रतिपादन आ.सुरेश धस यावेळी वारकऱ्यांशी संवाद साधताना केले.
या शोभायात्रेत आष्टी नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





stay connected