महिलांनी कुणाचीही तमा न बाळगता आत्याचाराच्या विरोधात आवाज उठवावा - पो. नि. शरद भुतेकर
राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी अभियानाचे कडा येथे आयोजन
कडा (प्रतिनिधी):- आष्टी तालुक्यातील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा आणि पोलीस ठाणे आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी अभियानाचे आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या उपस्थितीत आयोजन कडा येथे करण्यात आले होते.आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. शरद भुतेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी बोलताना श्री.भूतेकर यांनी व्यसनाचे आर्थिक, सामाजिक,मानसिक दुष्परिणाम सांगितले.तसेच मुख्यत: तरुण वर्गाने या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे आवाहन केले.महिलांच्या सुरक्षिततेसाठी नवनवीन कायदे करण्यात आले आहेत. महिलांनी कुणाचीही तमा न बाळगता आत्याचाराच्या विरोधात आवाज उठवावा. न घाबरता कायदेशीर तक्रार दाखल करावी. पोलीस कायम त्यांच्या पाठीशी राहुन त्यांना संरक्षण देतील.असा विश्वास दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते हे होते. त्यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थी आणी विद्यार्थिनींनी व्यसनापासून अलिप्त राहून कायद्या विषयक सतर्क राहावे.असे आवाहन केले. त्याच प्रमाणे उपस्थितांना कायद्याविशयक मार्गदर्शन केल्याबद्दल श्री.भुतेकर यांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. एस. एन. वाघुले यांनी केले. यावेळी विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


stay connected