कर्तव्यदक्ष पोलीस नाईक जाधव, दराडे यांना पदोन्नती ---------------------- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान

 कर्तव्यदक्ष पोलीस नाईक जाधव, दराडे यांना पदोन्नती 
----------------------
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान 



----------------------

राजेंद्र जैन /कडा  

------------------

आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विकास जाधव, संतोष दराडे या खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष आणि इमानदार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून हवलदार म्हणून सेवा पदोन्नती देण्यात आली. त्याबद्दल पोलीस ठाण्यात वरिष्ठांकडून पुष्पगुच्छ देऊन या दोन्ही कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


मागील अनेक वर्षापासून आष्टी पोलीस ठाण्यातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलीस दलात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष आणि इमानदार पोलीस नाईक विकास जाधव, संतोष दराडे या कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून हवालदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्याबद्दल आष्टीचे ठाणेदार शरदराव भुतेकर, सपोनि विजय नरवडे, विक्रांत हिंगे, नानासाहेब सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन दोन्ही पदोन्नती प्राप्त पोलिस हवलदारांचा यथोचित सन्मान करून अभिनंदन करण्यात आले.

-------%------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.