आज हभप भरत उर्फ बाळासाहेब शिंदे यांचे कीर्तन
-------------------
कड्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कीर्तन सोहळा
--------------
कडा/ वार्ताहर
------------------
कडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त येथील महेश मंदिरात आज हभप भरत उर्फ बाळासाहेब महाराज शिंदे यांचे आज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हरीकीर्तन होणार असल्याची माहिती संयोजकाकडून देण्यात आली.
आष्टी तालुक्यातील कडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे दि. शनिवार दि. 9 ते 26 ऑगस्ट या कालावधीत महेश मंदिरात भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन सोहळ्यात हभप निळकंठ महाराज तावरे (केळसांगवी), हभप सागर महाराज बोराटे (नातेपुते ) हभप पांडुरंग महाराज उगले (परभणी),
चांडाळ चौकडीच्या करामती या मालिकेतील उत्कृष्ट अभिनेता, हभप भरत उर्फ बाळासाहेब महाराज शिंदे (बारामती), हभप राऊत दादा महाराज (पिंपळनेर संस्थान पिंपळा) हभप गणेश महाराज भगत ( संस्थापक माऊली संगीत विद्यालय गुरुकुल पुणे ) हभप रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी देवाची ) या प्रख्यात कीर्तनकारांच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवारी सायंकाळी प्रख्यात कीर्तनकार तथा अभिनेता हभप. भरत उर्फ बाळासाहेब महाराज शिंदे यांचे आज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत हरीकीर्तन होणार असल्याची माहिती संयोजकाकडून देण्यात आली. या किर्तन सोहळ्याचा कडा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे आव्हान ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
--------%----------


stay connected