पत्रकार मा.जावेद सय्यद यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित

 पत्रकार  मा.जावेद सय्यद यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित




आष्टी


महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान सोहळा, सर्वांच्या सेवेसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी नवतरुणांनी चालवलेली राज्यव्यापी सामाजिक चळवळ सामाजिक चळवळीचा मानबिंदू साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार सोहळा नुकताच पुण्यात आयोजित करण्यात आला होता.  यात महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या,  साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक चळवळीच्या मानबिंदु  राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार वितरण सोहळा नुकताच भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ पुणे येथे पार पडला.

        या सोहळ्यात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील  दौलावडगाव येथील सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले व्यक्तिमत्वाला पोलीस मित्र समिती व पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल पत्रकार मा. श्री.जावेद  सय्यद सर यांचा रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी विद्येचे माहेरघर असणाऱ्या  पुणे शहरात राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांच्यावरती विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या मिळालेल्या सन्मानाने  माझी सामाजिक जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी येत्या काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी नवी उर्जा प्रोत्साहन पाठबळ देणार आहे. अशी भावना पत्रकार जावेद सय्यद सर यांनी व्यक्त केले.

         या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बाळराजे वाळुंजकर अभिनेते , धाराशिव शिरोळे व्याख्याते व प्रबोधनकार ,प्रमुख पाहुणे विष्णू देशमुख पोलीस सब इन्स्पेक्टर, चित्रा देशमुख बॉलीवुड अभिनेत्री ,भक्ती साधू सिने अभिनेत्री, केतकी गावडे अभिनेत्री, पूजा माळी लावण्यवती, संजय कोटगिरे उच्च न्यायालय नागपूर, हिमांशू जैन सुवर्णपदक विजेते ,प्रा सचिन देवरे सर व्याख्याते व साहित्य, आम्रपाली पारवे व्याख्याते व कवी आधी नामवंत, मान्यवर मंडळी, कलाकार या कार्यक्रमास आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

          हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक समितीचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे सर,  संस्थापक अध्यक्ष विकास उबाळे , दिपक राणे यांनी अथक परिश्रम घेत मोलाचे सहकार्य केले . यावेळी  मा.ॲड. उमाकांत आदमाने कवी साहित्य निवेदक यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करत सर्वांचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.