येवले शहरातील मुख्य नांदगाव रस्ता संपूर्ण पणे गेला खड्ड्यात, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात, रस्ते, रहिवाशी वृक्षारोपण करणार,
नाशिक प्रतिनिधी :- येवला,शहरातील मुख्य शहरातुन जाणारा रस्ता, लक्षमी आई माता मंदिर ते. हजरत पिर सैय्यद ईब्राहिमशाह बाबा दर्गाह चौक, ( हजरत सैय्यदबाबा चौक ) हा सा. बां. विभागात असलेला, मुख्य 40 गाव कडे जाणारा रस्ता गेल्या 25 वर्षां पासून खड्डेमय झालेला आहे तरी नाशिक जिल्हा व येवला सा.बां. विभागात सर्व, मनमानी भोंगळ कारभार चालू आहे ठेकेदार व. अधिकारी हे नागरिकांना उडवा- उडवी ची उत्तरे देतात राज्य सरकार चे यावर काहीच नियंत्रण राहिले नाही नांदगाव रोड पूर्ण खड्ड्यात खचुन गेला आहे सा. बां. दुर्लक्ष करीत आहे येवला तहसीलदार कार्या. कडे जाणारा गंगादरवाजा ते कोपरगाव हायवे लगत चा रस्ता खड्डेमय झालेला आहे शहरातील मुख्य रस्ते खड्ड्यात गेल्या मुळे सर्व नागरिकांना ये - जा साठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे, सर्व ठिक - ठिकाणी चारही बाजूला सर्वत्र ग्रामीण भागात देखील हिच अवस्था झालेली आहे या कडे जिल्हाधिकारी व पालकमंत्री हे स्वतः स्थळ पाहणी केव्हा करणार गुणवत्ता नियंत्रण पथकाद्वारे सखोल चौकशी करणार का...? येवला / नाशिक जिल्हा सा. बां. विभागात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, यावर राज्य सरकार वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे लक्ष देणार का असा सवाल संपूर्ण शहर व तालुका भर उपस्थित झालेला आहे. याबाबतचे, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, कौमे खिदमत सोशल फाउंडेशन, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती, यांच्या वतीने निवेदनाच्या प्रति, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. एकनाथराव शिंदे व पालकमंत्री, जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कडे पाठविले आहे. सदर निवेदनावर महा.प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, मोबीन मुलतानी, सलीम मुलतानी, आश्रफ़ मोमीन, रेहान मोमीन, अल्ताफ पठाण, सलीम कुरेशी, आदम मोमीन, सिद्धीक अन्सारी, अ.हमीदबाबा अन्सारी, संजय संत,राशीद शेख, मुनीर अन्सारी, धर्मराज अलगट, अरबाज कुरेशी, आरिफ सौदागर, जहीर अन्सारी, अकिल शेख, हुसेनहाजीबाबा कुरेशी, अरबाज मोमीन, समीर सैय्यद,अरबाज अन्सारी, वसीम अन्सारी, आदीसह सदस्य कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
stay connected