मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव व. विविध समस्या बाबत मागण्याचे निवेदन सादर...

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव व. विविध समस्या बाबत मागण्याचे  निवेदन सादर.... 


                  

औरंगाबाद जिल्हा विशेष प्रतिनिधी :- आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने राज्यातील दलित मुस्लिम आदिवासी भटके विमुक्त समाज, यांच्यावर सतत कायमस्वरूपी,  होणारे, अन्याय /अत्याचार, त्वरित, थांबवावे, मॉब लिंचिंग थांबवावी, गायरान, शेत जमीन कायम कराव्यात, अतिक्रमण नावाखाली सुरू असलेली कार्यवाही त्वरित, थांबवावी.

राज्यातील, सर्व समस्त मुस्लिम अल्पसंख्यांक, बहुजन, आदिवासी, भटके विमुक्त जाती जमाती आदिवासी पारधी, मातंग, ख्रिस्ती, दलित, मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील, असंख्य घटकांच्या अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आज औरंगाबाद येथे निवेदन देण्यात आले.


यावेळी, ऑल इंडिया पॅंथर  सेनेचे अध्यक्ष, दिपकभाई केदार, महाराष्ट्र प्रवक्ते युवक अध्यक्ष अमोल (बंटीदादा) सदाशिवे, महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष,जनसेवक,  मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, युवा जिल्हाध्यक्ष अविनाश हिवाळे, यांनी  राज्याच्या, कोअर कमिटीच्या वतीने यावेळी निवेदन सादर करून मुख्यमंत्री यांचे मागण्याकडे सर्वत्र लक्ष वेधलेले. होते.


यावेळी, भारतरत्न"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो"         भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद, हम भारत के, स्वाभिमानी नागरिक हैं....हमे भीक नहीं हक चाहिये,  हम सब एक हैं.... च्या भव्य घोषणाने औरंगाबाद चा विमानतळ परिसर सदस्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दणाणून टाकला,होता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.