माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
-----------------------------------
आष्टी दि. (वार्ताहर) आष्टी -पाटोदा- शिरूर मतदार संघाचे माजी आमदार शिक्षणमहर्षी भीमराव धोंडे यांच्या 05 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या वाढदिवसानिमित्त शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या भगवान महाविद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या उपक्रमांमध्ये शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचे विषय आहेत- 1) वॉर विदाऊट सोल्जर्स: द ड्रोन रिव्होलुशन ऑफ 2025
2) इम्पॉर्टन्स ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इन ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट
3) ईम्पावरिंग वुमेन, ईम्पावरिंग ह्युमॅनिटी
4) अँटीबायोटिक रेझिस्टन्स: अ सायलेंट त्सुनामी. या उपक्रमाचे संयोजक म्हणून प्रो. दिगंबर पाटील (8275495161)व प्रा. श्रीकांत धोंडे (9420396435) हे काम पाहत आहेत.
सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परीक्षेचे संयोजन डॉ. अनिल हजारे(9049226777), डॉ.बन्सी वाळके (9421349065) व प्रा. नंदकिशोर धोंडे(7821971313) हे करत आहेत.
वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये पर्यावरण संवर्धन या विषयावर सोळा वर्षा वरील विद्यार्थ्यांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे संयोजन डॉ. वंदना घोडके(9921280261), डॉ. दादासाहेब सदाफुले(9823934847), डॉ. आबासाहेब पोकळे(9763434546) व प्रा.श्रीरंग पवार(9420019985) हे करत आहेत.
या सर्व उपक्रमांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संबंधित उपक्रमाच्या संयोजकाशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.


stay connected