हेमंत पोखरणा यांना संघटनात्मक पुरस्कार जाहीर
-----------------
कडा ( प्रतिनिधी) - इतिहास संकलन संस्थेच्या ( देवगिरी प्रांत ) वतीने देण्यात डॉ सतीश मित्तल संघटनात्मक पुरस्कार येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांना जाहीर झाला आहे.
अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली यांच्याशी संलग्न असलेल्या इतिहास संकलन संस्था , महाराष्ट्र राज्य ( देवगिरी प्रांत) यांच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या डॉ. सतीश मित्तल संघटनात्मक पुरस्कारासाठी कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांची निवड करण्यात आली. पोखरणा यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवार दि. 12 ऑगस्ट रोजी माजलगाव येथे इतिहास संकलन संस्थेच्या प्रांतीय अधिवेशनात पोखरणा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .
--------%%------


stay connected