*अमेरिकेच्या दांडगाईवर नियंत्रण आणणे गरजेचे!*
✍🏻
*युन्नूस तांबोळी, अकलूज*
एक ऑगस्ट पासून भारतीय बनावटीच्या वस्तूंवर सरसकट पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केला ,एवढ्यावरच न थांबता भारत रशियाकडून खनिज तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी करतो इराणशी व्यापारी संबंध ठेवतो यासाठी दंड म्हणून व्यापार कराराच्या पन्नास टक्के इतका दंड असू शकतो ,यामुळे भारताचे दुहेरी दुखणे झाले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपली अर्थव्यवस्था सुदृढ करणे आणि जागतिक व्यापारात आपले वर्चस्व टिकवणे यासाठी विविध राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध आणून व्यापारी युद्धाची पार्श्वभूमी तयार करत आहेत ,यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होत आहे. अमेरिका स्वतःच आपल्या पारंपारिक व्यापारी भागीदाराशी संबंध बिघडवत आहे. भारत चीनसह युरोपीय देशांवर लाभलेले आयात निर्यात निर्बंध आणि जागतिक व्यापार परिषदेच्या भूमिकेवर सतत होणारी टीका हे व्यापार युद्धाचे संकेत आहे .आज कोणतेही राष्ट्र त्याला लागणारी सर्वच उत्पादने स्वतःच्या राष्ट्रांमध्ये निर्माण करू शकत नाही आयात निर्यात करूनच सर्व देशांचा कारभार सुरू आहे जग मुक्त आणि खुल्या व्यापाराच्या दिशेने जात आहे अमेरिकेचे हे उलटे धोरण जागतिक आर्थिक स्थैर्यावर परिणाम करणारे आहे. या व्यापार युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे ,भारतासारख्या देशांना नव्या व्यापाराची संधी शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्यातील काही अंध भक्तांना वाटते की अमेरिकेला या निर्णयाचा फटका बसेल तेव्हा त्यांना आपली किंमत कळेल ,या मंडळीचे अर्थव्यवस्थेचे ज्ञान अपुरे वाटते कारण आपल्यापेक्षा दहापट अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे
तुमच्या या निर्णयासंदर्भात अमेरिकेशी लवकरात लवकर द्विदेशीय करार करणे हा एकच उपाय आपणासमोर राहतो, भारतीय कृषी दुग्ध व्यवसाय आदींबाबत अमेरिकेस हव्या असलेल्या सवलती आपण अजिबात देऊन चालणार नाहीयामुळे येथील तोळा मासा कृषी क्षेत्र यामुळे कोलमडून जाईल यासाठी यासाठी ट्रम्पचा तोरा उतरवायलाच हवा.


stay connected