वर्षश्राद्धा निमीत्त प्राथमिक शाळेतील मुलांसाठी ग्राउंड तयार करण्यासाठी 31 हजार रुपये तसेच शाळेच्या आवारात विविध वृक्षरोपण
आष्टी तालुक्यातील पारोडी येथे आजीच्या वर्षश्रद्धा निमित्त अनावश्यक खर्च टाळूल अनोखा उपक्रम व समाजिक कामात व नैसर्गिक कामात अग्रेसर असणारे दादा घोडके यांनी एक सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रम राबवून अनुकरणीय उदाहरण मांडले आहे. आणि त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांसाठी मातीचे ग्राउंड तयार करण्यासाठी 31 हजार रुपये दिले तसेच शाळेच्या आवारात विविध वृक्षरोपण करून एक स्तूत्य उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
दादा घोडके यांना नेहमी वाटते आपण एक समाजासाठी काही तरी देणं आहे म्हणून त्यांना वाटले आपल्या पारोडी गावातील शाळेला शिक्षणासाठी सहाय्य करावे त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांसाठी ग्राउंड तयार करण्यासाठी 31 हजार रुपये देऊन त्यांनी मदत केली आणि शाळेतील मुलांना नैसर्गिक खेळण्याची सोय करून दिली. तसेच पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे म्हणून शाळेमध्ये वेगवेगळ्या जातींची झाडे लावून हरितक्षेत्र वाढविण्यासाठी योगदान दिले. त्यांनी अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्य वर्षश्राद्धासारख्या कार्यक्रमातील अनावश्यक खर्च टाळून समाजहिताच्या कामांना प्राधान्य दिले आहे. तसेच हभप सोमनाथ महाराज मेटे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला. यावेळी गावकरी, नातेवाईक,मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. अशा प्रकारच्या सामाजिक जागृतीमुळे इतरांनाही पर्यावरण आणि शिक्षणक्षेत्रात योगदान देण्यास प्रेरणा मिळेल. हा उपक्रम समाजातील जबाबदारीची भावना आणि पर्यावरणप्रेम दर्शवतो आहे.




stay connected