लोकमान्य टिळक हे भारत देश स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते- गुणवंत एच.मिसलवाड


लोकमान्य टिळक हे भारत देश स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते- गुणवंत एच.मिसलवाड



नांदेड  - आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून, भारत देश स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारक, शुरविर, समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानी हे शेवटच्या श्वासापर्यंत योगदान दिले असून त्यातीलच एक स्वातंत्र्य सेनानी भारत देश स्वातंत्र्यासाठीचे अग्रणी नेते म्हणजेच लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक हे होत, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.23 जुलै 2025 बुधवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता थोर समाजसुधारक, पत्रकार, जहालमतवादी, मुरब्बी राजकारणी नेता, महान अभ्यासक, तत्वज्ञ, लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक यांच्या 169 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

सर्वप्रथम एसटीचे विभागीय वाहतुक अधिक्षक तथा रापम नांदेड आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक मा.श्री.मिलींदकुमार सोनाळे यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुढे बोलताना मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच हे ध्येय उराशी बाळगून देश स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशासमोर प्रस्ताव ठेवला व शिव जयंती आणि गणेशोस्तव व द.मराठा, केसरी (इंग्रजी) या राष्ट्रीय वृत्तमान पत्राद्वारे जनतेला एकत्रित करून देश स्वातंत्र्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे महान कार्य त्यांनी केले. व भारत देश स्वातंत्र्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. अशा या महान स्वातंत्र्य सेनानिचा तुम्ही आम्ही आपण सर्वांनीच आदर्श घेवून समाजाप्रती व देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते शेवटी यावेळी म्हणाले.



या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय वाहतुक अधिक्षक मिलींदकुमार सोनाळे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णू हारकळ, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, वाहतुक निरीक्षक सुधाकर घुमे, कवी भास्कर गिते, पाळी प्रमुख मनोहर माळगे, विनायक चव्हाण, आनंदा कंधारे, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, सुनिता हुंबे, वैशाली कोकणे, पातेकर, कृष्णा पवार, संजय मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी रापम आगारातील कामगार-कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.