*राज्यस्तरीय वधु वर सूचक व परिचय मेळाव्याचे*
*माजी मंत्री आ.सुरेश धस यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन*
मराठा सेवा संघाच्या वधुवर सुचक व सामूहिक विवाह कक्षाच्या वतीने रविवारी आष्टी येथे वधू वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळावा येथील जिजाऊ मंगल कार्यालय येथे होणार होणार असून मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री तथा आष्टी- पाटोदा - शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस हे करणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम सकाळी 10:00 वाजता होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. तानाजी बापू जंजिरे यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध तालुक्यातून या मेळाव्यासाठी वधू- वरांनी नाव नोंदणी केलेली आहे.
पाथर्डी येथील वृद्धेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी सल्लागार आदरणीय जे.आर. पवार साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकजी ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपाध्यक्ष शिवमती वर्षाताई माने, मराठा सेवा संघ बीड पूर्वचे अध्यक्ष शिवश्री नागनाथ जाधव, बीड पश्चिमचे अध्यक्ष शिवश्री धनंजय शेंडगे, संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष प्राचार्य शशिकांत कन्हेरे ,जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय कार्याध्यक्ष शिवमती संपूर्णाताई सावंत, विभागीय उपाध्यक्ष शिवमती सुवर्णाताई गिरे आणि बीड जिल्हाध्यक्ष शिवमती संगीताताई शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मराठा समाजातील नातेवाईक व कुटुंबातील आपसातील संवाद कमी झालेला आहे. त्यामुळे विवाह या विषयावर चर्चा होत नाही. विवाह जुळवणाऱ्या मध्यस्तांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे. वधु वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून अनुरूप व तोलामोलाचे स्थळे पहावयास मिळतात. विवाह इच्छुक व त्यांचे पालक या निमित्ताने आपापल्या नातेवाईकांना भेटतात. तेव्हा राज्यातील जास्तीत जास्त इच्छुक वधु वर व त्यांच्या पालकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी आष्टी शहरात जय्यत तयारी चालू आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये स्वागत समिती, स्टेज व्यवस्था समिती, बैठक व्यवस्था समिती, अल्पोपहार समिती, नाव नोंदणी समिती इत्यादी समित्यांचा समावेश आहे.
stay connected