श्रीमती.सुनिता हिरामण मासाळकर यांची आसाम राज्यात गुवाहाटी येथे होणाऱ्या सी.सी.आर.टी प्रशिक्षणासाठी निवड

 *श्रीमती.सुनिता हिरामण मासाळकर यांची आसाम राज्यात गुवाहाटी येथे होणाऱ्या सी.सी.आर.टी प्रशिक्षणासाठी निवड*



========================================

*अहील्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे येथे कार्यरत असलेल्या गणित,विज्ञान विषयातील पदवीधर 

तसेच उपक्रमशील शिक्षिका श्रीमती. सुनिता हिरामण मासाळकर यांची केंद्रशासनाच्या सी. सी. आर. टी.( सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग न्यू दिल्ली.) या संस्थेद्वारे आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. हे प्रशिक्षण आसाम राज्यातील गुवाहाटी येथे २४ जुलै 2025 पासून ते 13 ऑगस्ट 2025 पर्यंत होणार आहे.

सविस्तर वृत्त असे की श्रीमती.सुनिता मासाळकर या पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे नलवडे येथे कार्यरत असून त्यांनी शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले.त्यांच्या या चांगल्या कार्याची दखल घेऊन केंद्रशासनाच्या अंतर्गत चालणाऱ्या सी.सी.आर. टी.प्रशिक्षणासाठी त्यांची अहिल्यानगर जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शालेय शिक्षणात विविध भारतीय कला,संस्कृती,लोकपरंपरा,नाट्य,हस्तकला,अशा अनेक गोष्टींचा प्रभावीपणे वापर करून अध्यापन करणे हे असून देशभरातील निवडक शिक्षकांना यासाठी संधी दिली जाते.या प्रशिक्षणासाठी राज्यातून नऊ शिक्षकांची निवड झाली आहे.

     श्रीमती. सुनिता हिरामण मासाळकर

ह्या अहील्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याने ही गौरवाची बाब आहे.त्यांच्या या निवडीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी अहील्यानगर, संगमनेर डायट प्राचार्य श्री राजेश बनकर साहेब, शिक्षणाधिकारी अहील्यानगर, श्री बाळासाहेब बुगे गट शिक्षणाधिकारी श्री कराड साहेब पं.स.पाथर्डी,शिक्षण विस्तार अधिकारी श्री भवार साहेब, साकेगाव केंद्रप्रमुख श्री गोरे साहेब ,मुख्याध्यापक श्री गर्जे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अमोल भाऊ नलवडे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्रपरिवार तसेच सर्वच स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करून पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.