श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ रथाची महापूजा दादेगाव येथे संपन्न.
गर्भगिरीडोंगर सावरगाव ता.आष्टी येथून पंढरपूर कडे निघालेल्या दिंडी रथाचे दादेगाव येथे आगमन झाले. ग्रामस्थातर्फे भव्य स्वागत करण्यात आले. प्रतिवर्षी या ठिकाणी नाथ रथाची महापूजा करण्यात येते. यावर्षीची महापूजा सागर सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आली.व बबनदेवा यांनी मंत्रघोषात विधिवत अभिषेक केला.
या दिंडी सोहळ्याचे हे ३९ वर्ष आहे. वै. ह भ.प.रघुनाथ महाराज उंबरेकर, वै.ह.भ.प.सावजीबाबा व ह.भ.प हंडाल महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ सावरगाव,शेंडगेवाडी यांच्या अधिपत्याखाली व जनता जनार्दनाच्या सहकार्याने हा पायी दिंडी सोहळा शुक्रवार दि.०४/०७/२०२५ रोजी पंढरपूर येथे पोहचेल.
दादेगाव येथे अण्णासाहेब इथापे प्रतिष्ठाण तर्फे वारकऱ्यांना नाश्त्यासाठी पोहे, चहा व पावसापासून संरक्षणासाठी गोंगटे वाटप करण्यात आले. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत लोखंडे, ह.भ.प भानुदास महाराज, सुखदेव महाराज, विठ्ठल भगत तसेच मा. सरपंच रामदास कोल्हे, रामकृष्ण इथापे, संजय निंबाळकर, बाबासाहेब पोटे, बाबासाहेब बांदल, मुरलीधर विधाते, वसंत बांदल, दीपक पोकळे, श्रीराम इथापे, सतिष कोल्हे, अक्षय बांदल, भरत पोकळे, विक्रम बांदल, सचिन बांदल,दीपक बांदल, भाऊसाहेब पठारे, उध्दव पठारे, अंकुश बांदल, बाळराजे पठारे, संभाजी खेंगरे, सोपान पठारे, श्रीकांत इथापे, शिवाजी कोल्हे, अशोक वाघुले,नाना वाघमोडे, अशोक पोटे, प्रा.अजित इथापे, सीतारामबाबा वाघुले,लक्ष्मण पठारे, विठ्ठल गर्जे, किसन यादव आदि उपस्थित होते.
हा दिंडी रथ देवीनिमगाव मार्गे केरूळ, मांडवा, आष्टी,बलेवाडी, खडकत, नवसरवाडी, जातेगाव,करमाळा,माढा कारखाना, करकंब, भोसे, विठ्ठल कारखाना, मार्गे पंढरपूर येथे पोहचेल.


stay connected