आता शेतकऱ्यांला कृषी पंपासाठी वीज दिवसा मिळणार..
-----आ.सुरेश धस
*********************
आठ वीज उपकेंद्रासाठी ५ आणि १० एम.व्ही.ए. चे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध..
*********************
*********************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी मतदार संघात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत नवीन अतिरिक्त ८ सब स्टेशनला ५ व १० एम.व्ही.ए. चे ट्रांसफार्मर मतदारसंघासाठी उपलब्ध झाले असल्याने यापुढे आता कृषी पंपासाठी शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा होणार असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली याबद्दल मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत आष्टी मतदार संघातील ८ सबस्टेशनला ५ एम.व्ही ए. चे अतिरिक्त नवीन ट्रान्सफर मंजूर होऊन ते मतदारसंघात दाखल झाले असून या सबस्टेशनला उच्च दाबाने पुरवठा होणार आहे पारगाव जोगेश्वरी,शिराळ,टाकळी अमिया,वाहिरा,पिंपळा तसेच शिरूर तालुक्यातील मानूर टाकळी,तिंतरवणी या सबस्टेशनला अतिरिक्त ५ एम. व्ही.ए.चे तर ब्रम्हनाथ येळंब या सबस्टेशनला १० एम. व्ही.ए.चे ट्रांसफार्मर दाखल झाले आहेत. पाटोदा तालुक्यातील सबस्टेशन प्रस्तावित आहेत तेही लवकर मंजूर होतील त्यासाठी पाठपुरावा चालू आहे.त्यामुळे शेतकऱ्याला आता दिवसा वीजपुरवठा होणार असून शेतकऱ्याचा रात्री अपरात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही त्यामुळे होणारे नैसर्गिक अपघात कमी होणार आहेत.विद्युत रोहित्र जळण्याचे प्रमाण देखील कमी होणार आहे.तसेच उच्च दाबाने पुरवठा होणार असून या योजनेअंतर्गत सोलर प्लांट उभारणार असून यातून सबस्टेशन वीजपुरवठा होणार आहे.काही ठिकाणी सोलर प्लॅन्टचे काम प्रगतीपथावर असून जागा संपादनाचे कामे पूर्ण प्रगतीपथावर आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला --आमदार सुरेश धस
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला दिवसा पुरवठा करणार.. सरकार ने दिलेला शब्द पूर्ण केला. मतदारसंघात दिवसा वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो.
शेतकऱ्याला दिलासा
शेतकऱ्याला रात्री अप रात्री पाणी देण्यासाठी येणाऱ्या अडचणी व नैसर्गिक अपघात टाळले जाणारा असून ८ सबस्टेशनला ५ एम.व्ही ए. चे अतिरिक्त नवीन ट्रान्सफर मंजूर होऊन ते मतदारसंघात दाखल झाले असून या सबस्टेशनला उच्च दाबाने पुरवठा पारगाव जोगेश्वरी,शिराळ,टाकळी अमिया,वाहिरा, पिंपळा तसेच शिरूर तालुक्यातील मानूर टाकळी,तिंतरवणी या सब स्टेशनला अतिरिक्त ५ एम. व्ही.ए. चे तर ब्रम्हनाथ येळंब या सबस्टेशनला १० एम. व्ही.ए. चे ट्रांसफार्मर दाखल झाले असून मतदारसंघातील शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला असल्याने आ.सुरेश धस यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
stay connected