भूसंपादन, पुनर्वसन, यासह प्रलंबित रस्ता कामे बांधरस्ते हद्दनिश्चिती, आणि रोड रोमिओंचा बंदोबस्त करावा.. विकास आढावा बैठकीमध्ये आ.सुरेश धस यांच्या सक्त सूचना

 भूसंपादन, पुनर्वसन, यासह प्रलंबित रस्ता कामे 
बांधरस्ते हद्दनिश्चिती, आणि रोड रोमिओंचा बंदोबस्त करावा..
विकास आढावा बैठकीमध्ये 
आ.सुरेश धस यांच्या सक्त सूचना 



आष्टी (प्रतिनिधी )

 आष्टी पाटोदा आणि शिरूर (कासार) तालुक्यातील जनहिताची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत विशेषतः खुंटेफळ साठवण तलावासाठी उर्वरित भूसंपादन आणि कुंभेफळ खुंटेफळ या दोन गावांचे पुनर्वसन, रस्त्यांची अपूर्ण कामे आणि बांधरस्ते ८ ते १२ फुटापर्यंत रस्ते रूंद करावेत

यासाठी अतिक्रमण असेल तर काढून टाकावे 

शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी पोलिसांनी रोडरोमीयांचा  बंदोबस्त करावा यासह अनेक विकास कामांबाबत आष्टी पाटोदा आणि शिरूर (कासा तालुक्यातील सर्व खाते प्रमुखांच्या बैठकीमध्ये आ.सुरेश धस यांनी कार्यवाही बाबत 

सक्त सूचना दिल्या आहेत आष्टी तहसील कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती वसिमा शेख, आष्टी तहसीलदार वैशाली पाटील, तहसीलदार पाटोदा आणि तहसीलदार शिरूर कासार हे उपस्थित होते सुरुवातीला माजी सैनिकांचे सर्व प्रश्न सोडवणे बाबत अंकुश खोटे यांनी निवेदन दिल्यानंतर याबाबत चर्चा झाली त्यावेळी माजी सैनिकांना मालमत्ता करा मध्ये सूट मिळणे बाबत असलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे याबाबत लक्ष देण्याची मागणी केली त्यावर  उपविभागीय अधिकारी यांनी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले खुंटेफळ साठवण तलाव अंतर्गत उर्वरित 480 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण करून खुंटेफळ कुंभेफळ सोलापूर वाडी येथील जमीन मोजणी पूर्ण झाल्यानंतर  आराखडा तयार करून एकत्रित मोबदला वाटप करण्याच्या सूचना दिल्या 

हा आराखडा ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर डकवण्यात यावा आणि संयुक्त मोजणी झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात यावे याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्पष्ट सूचना दिल्या तसेच याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी बैठक घ्यावी असे सांगितले तालुक्यातील दर्जेदार दर्जेदार रस्ते निर्मिती झाल्यानंतर पाईपलाईन साठी रस्ते खोदण्यात येतात त्याबाबत सर्व संबंधित शेतकऱ्यांना याबाबत नोटीसा देण्यात याव्यात सिंदफणा प्रकल्पाची उंची वाढवणे तसेच उखळवाडी जाधव वाडी प्रकल्प रखडलेले असून याबाबतची कारवाई तात्काळ करण्याची सूचना दिल्या तसेच आष्टी तालुक्यातील गहूखेल आणि ठोंबळ सांगवी या प्रकल्पाचे देखील लवकरच पूर्ण करावे याबाबत सूचना दिल्या तसेच ग्रामीण भागातील बांध रस्ते हे आठ ते बारा फुटापर्यंत मंजूर करण्यात यावेत असा शासन निर्णय असून या रस्त्याच्या पूर्ण करण्यासाठी साठी पोलिसांचा बंदोबस घेण्यात यावा प्रमुख जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग आणि राज्य रस्त्यांवर झालेले अतिक्रमणे दूर करावेत आष्टी पाटोदा आणि शिरूर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील बोगस लाभार्थी यांचा शोध घेण्यात यावा आणि एजंटांवर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश आ.सुरेश धस यांनी दिले तसेच घरकुलाच्या बांधकामासाठी सर्व संबंधितांनी तातडीने लक्ष देऊन लाभार्थ्यांना हप्ते वाटप करावेत जलसिंचन विहिरीतील रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेले हजेरीपत्र सुरू करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले तसेच तिन्ही तालुक्यातील अनावश्यक गाय गोठे प्रकरणे मंजूर करू नयेत असे सांगितले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.